औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी सातच्यादरम्यान सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न ( CM Eknath Shinde on Marathwada Liberation Day ) झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि कार्यक्रम आटोपुन ते रवाना झाले मात्र गृहमंत्री अमित शहांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाचा सोपस्कार उरकल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परंपरा मोडल्याचा आरोप : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 वाजता होणारा कार्यक्रम सकाळी 7 वाजता उरकला त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यावर टीका सुरु केली आहे. आधितर मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का या बद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते पण ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले पण त्यांनी परंपरेनुसार सकाळी 9 वाजता होणारा कार्यक्रम सकाळी 7 वाजताच उरकुन घेतला आणि त्यांच्यावर टीका सुरु झाली.
थोडक्यात आटोपला कार्यक्रम :मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. आज ध्वजारोहन झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांची घोषणा केली.औरंगाबाद येथील कार्यक्रम आटोपून ते हैदराबादला रवाना झाले. हैदराबादमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक, या तीन राज्यांचा मिळून मुक्तिसंग्रामाचा एक संयुक्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली तेथे शिंदेही उपस्थित राहीले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे ध्वजारोहन केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री:औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी 157 कोटी त्यासोबत रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामेही वेगाने व्हावीत, यासाठी भरीव तरतूद केल्याचे त्यांनी या निमित्ताने बोलताना सांगितले तसेच मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी, दुष्काळ संपवण्यासाठी, पश्चिमी नद्यांचे पाणी वळवण्यासाठी आणि मराठवाड्याच्या विकासाला वेग मिळावा, यासाठी सरकार काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.