औरंगाबाद-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तीन रुग्णांचे सोमवारी सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी एकाच दिवशी चार रुग्ण आढळून होते.
सोमवारी सायंकाळी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये दोन मुलांसह महिलेचा समावेश आहे. यात भीमनगर भावसिंगपुरा येथे 16 वर्षीय मुलाला, किलेअर्क येथे 65 वर्षीय महिलेला तर नूरकॉलनी येथे 5 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा-ग्रामीण भागात आढळला कोरोनाचा रुग्ण; दौलताबाद येथील महिलेला लागण
दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये 7ने वाढ झाली आहे. तर सकाळी किलेअर्क येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या घरातील सदस्यांसह जवळपास 45 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना पालिकेने विलगीकरणात ठेवले आहे. तर 17 वर्षीय तरुणाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
हेही वाचा-टाळेबंदीत नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा; 'या' संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
औरंगाबादची रुग्णसंख्या 56वर गेली आहे. तर 23 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना लागण कोणाकडून झाली, त्याचा स्त्रोत तपासण्याचे काम करण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (सोमवारी) राज्यात 522 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 8 हजार 590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 27 जणांचा आज मृत्यू झाला आहे.