महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे १०१ नवे रुग्ण, एकूण संख्या १२ हजार १२६ वर - कोरोना रुग्ण संख्या

औरंगाबाद जिल्ह्यात आज १०१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत १२ हजार १२६ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ६ हजार ६९० बरे झाले, ४१७ जणांचा मृत्यू झाला. तर ५ हजार १९ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

101-new-patients-of-corona-in-aurangabad
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे १०१ नवे रुग्ण

By

Published : Jul 23, 2020, 2:28 PM IST

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील १०१ रुग्णांचे अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत १२ हजार १२६ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ६ हजार ६९० बरे झाले, ४१७ जणांचा मृत्यू झाला. तर ५ हजार १९ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर व्यापारी आणि उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात पहिल्या दिवशी तीन कंपन्यांच्या १७६ कामगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तिघांना बाधा झाली असल्याच समोर आलं. तर बुधवारी दिवसभरात प्राप्त अहवालात ३५९ नवे रुग्ण आढळून आल्याच समोर आलं आहे. त्यामुळे शहरात वेगाने संसर्ग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गुरुवारी सकाळी प्राप्त अहवालात मनपा हद्दीत ८० नवे रुग्ण आढळून आले आहेत ज्यामध्ये विठ्ठल नगर (२),गांधी नगर (१०), दलालवाडी (२), राम नगर (६), सावित्री नगर, हर्सुल (६), कुंभार गल्ली, हर्सुल(१), पडेगाव (४), स्वामी विवेकानंद नगर (३), कैसर कॉलनी (२), टाइम्स कॉलनी (१), अविष्कार कॉलनी, एन सहा (१), पुंडलिक नगर (१), छावणी (१), पद्मपुरा (१), क्रांती नगर (१), बन्सीलाल नगर (४), बनेवाडी (३), छावणी (१), मयूर पार्क (१), उस्मानपुरा (१), शिवशंकर कॉलनी (५), गुलमोहर कॉलनी, एन पाच (२), विश्व भारती कॉलनी (२), हनुमान नगर, गल्ली नं. पाच (१), विष्णू नगर (१), ठाकरे नगर, एन दोन सिडको (१), एन दोन, जिजामाता कॉलनी (१), बालाजी नगर (२), एसआरपीएफ परिसर (१), हिमायत बाग परिसर (२), जवाहर कॉलनी (१), सिल्क मिल कॉलनी (१), गणेश नगर (१), एसबी मुलांचे वसतिगृह परिसर (१), दर्गा रोड परिसर (१), देवगिरी नगर, सिडको (२), अन्य (२) या भागातील रुग्णांचा समावेश आहे त्याच बरोबरग्रामीण भागात १७नवे रुग्ण आढळुन आले ज्यामध्येकन्नड (१), साराभूमी परिसर, बजाज नगर (२), वडगाव, बजाज नगर (२), इंद्रप्रस्थ कॉलनी (१), राजवाडा, गंगापूर (२), इंदिरा नगर, वैजापूर (१), इंगळे वस्ती, वैजापूर (१), घायगाव (१), परदेशी गल्ली, वैजापूर (१), कमलापूर (१), अंभई (१), प्रसाद नगर, सिल्लोड (१), रांजणगाव (२) या भागातील रुग्ण आहेत. तर शहरात दाखल होणाऱ्या मार्गांवर केलेल्या तपासणीत ४रुग्ण आढळून आले आहेत.

शहरातील एका खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील ६४ वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात वंजारवाडीतील ७० वर्षीय स्त्री आणि ८० वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details