औरंगाबाद :महाराष्ट्र सध्या संकटात आहे. मंत्रिमंडळ नसल्यामुळे ( Lack of Cabinet in State ) महाराष्ट्रात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. हे सरकार बेकायदेशीर सरकार आहे. सरन्यायाधीश व्ही. रमन्ना ( Justice Ramanna ) लवकर निर्णय घेतील आणि न्याय देतील.सरकार पडणार आहे, हे सरकार औटघटकेचं सरकार ठरेल, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधताना नवीन सरकारवर टीका ( Criticism of New Government ) केली.
बंडखोर आमदारांच्या शुभेच्छांचा उपयोग नाही :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला बंडखोर आमदारांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यात माजी मुख्यमंत्री असे म्हणाले आहेत. या शुभेच्छांना काही अर्थ नाही. खरा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. बंडखोर आमदारांनी दिलेल्या शुभेच्छा काही मनातून दिलेल्या शुभेच्छा नाहीत. त्यांनी कशाही शुभेच्छा दिल्या तरी त्याला काही महत्त्व नाही. बंडखोर आमदार पुन्हा निवडून येणारे नाहीत, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
राष्ट्रपती यांच्या नावापुढे जात का :आमचे रक्त काढले तर त्यातून फुले-शाहू-आंबेडकर बाहेर निघतील. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, त्याच्यापुढे त्यांची आदिवासी ही जात लावली. पण शपथ घेण्याच्या आधी मंत्रोच्चार केला गेला, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी भर कार्यक्रमात मंत्रोच्चाराची क्लिप वाजवली. शिल्पकार देवरे यांनी कुठल्या शिल्पाचा अभ्यास केला माहिती नाही. सिंहाचे जबडे बंद होते, पण या सिंहाचे जबडे उघडे आहेत. पण, रमन्ना यांनी सांगितले की अशोकस्तंभावरील सिंह संविधानाला धरून नाहीत. रमन्ना यांचे दोन महिने रिटायरमेंटचे राहिले आहेत, तोपर्यंत काही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही.