औरंगाबाद - गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात Ganeshotsav 2022 सुरुवात होत आहे. सर्वच मंडळांनी यंदा जय्यत तयारी केली आहे. शहरात काही वैशिष्ट्यपूर्ण असे मंडळ आहेत त्यातील एक म्हणजे कुवारफल्लीचा जागृत गणेश Jagurt Ganapati मंडळ. या बाप्पाच वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे बाप्पाची स्थापना होत असताना मूर्ती काराच्या घरातून मूर्ती हलली नव्हती. त्यावेळेस स्थानिक रहिवाशांना नवस करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मूर्ती हलली त्यांनतर स्थापना करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्वात पहिली मोठी मूर्ती -
कुमार फल्ली येथील जागरूक गणेश Jagurt Ganapati मंडळ शहरातील सर्वात जुन गणेश मंडळ म्हणून परिचित आहे. दरवर्षी नित्यनियमाने गणपतीची स्थापना ही केली जाते. 1981 साली पहिल्यांदाच 15 फुटी बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली. त्यावेळचे प्रसिद्ध मूर्तिकार रतनकुमार बगलीये यांनी ही आकर्षक अशी मूर्ती साकारली होती. दहा दिवस मूर्ती स्थापना करायची आणि त्यानंतर विसर्जन करण्याचे नियोजन मंडळाने केले होते. मात्र बाप्पाच्या स्थापनेच्या दिवशी ही मूर्ती जागेवरून हलली नाही. दिवसभर वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र मूर्तीने आपली जागा सोडली नाही. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी राजूरच्या गणपतीला नवस केला. दुसऱ्या दिवशी 11 ब्राह्मणांच्या माध्यमातून नागरिकांनी अभिषेक केला आणि त्याच वेळेस चमत्कार झाला. मूर्ती आपल्या जागेवरून हलली त्यामुळे बाप्पाची स्थापना एक दिवस उशिराने करावी लागली. अशी माहिती मंडळ विश्वस्तांनी दिली.