औरंगाबाद - घाटी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील वार्ड क्रमांक ३४ मधील खोलीच्या खिडकीतून उडी घेत आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी समोर आले. काकासाहेब कणसे (वय- ४२, रा. धानगाव पैठण) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती देऊन घाटी प्रशासनाकडून एमएलसी नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
घाटीत कोरोनाबाधिताची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरुन मारली उडी - औरंगाबाद कोरोना अपडेट बातमी
क्टरांचा राऊंड चालू असताना कणसे यांनी पिण्यासाठी पाणी मागीतले. डॉक्टरांनी त्यांना पाणी दिले. त्यांनतर त्यांनी संडास आल्यासारखे सांगितले. डॉक्टरांनी सफाई कर्मचारी बोलवत, कर्मचारी बेड पॅन घेऊन तेथे पोहोचले. त्यांना लाज वाटत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी बाहेर थांबण्यास सांगितले आणि पडदा लोटून घेतला. १० ते १२ मिनीटांनी सफाई कर्मचाऱ्यांना धापकन आवाज आला त्यांनी पडदा सरकावून बघितल्यावर कणसे बेडवर नसून त्यांनी खिडकीतून उघडी घेतली होती. सफाई कर्मचाऱ्यांनी लगेचच वॉर्डातील ब्रदरला आवाज दिला. त्यानंतर वार्डातील ब्रदर तिथे पोहोचले, ब्रदर यांनी खिडकीतून खाली बघितल्यावर, त्यांना कणसे खाली पडलेले दिसले.
कणसे यांना २१ सप्टेंबरला उपचारासाठी अतिविशेषोपचार इमारतीत दाखल करण्यांत आले होते. त्यातच २५ सप्टेंबरला त्यांची तब्येत गंभीर झाल्यामुळे त्यांना याच इमारतीत आयसीसीयुमध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते. रविवारी सकाळी सातच्या दरम्यान डॉक्टरांचा राऊंड चालू असताना कणसे यांनी पिण्यासाठी पाणी मागीतले. डॉक्टरांनी त्यांना पाणी दिले. त्यांनतर त्यांनी संडास आल्यासारखे सांगितले. डॉक्टरांनी सफाई कर्मचारी बोलवत, कर्मचारी बेड पॅन घेऊन तेथे पोहोचले. त्यांना लाज वाटत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी बाहेर थांबण्यास सांगितले आणि पडदा लोटून घेतला. १० ते १२ मिनीटांनी सफाई कर्मचाऱ्यांना धापकन आवाज आला त्यांनी पडदा सरकावून बघितल्यावर कणसे बेडवर नसून त्यांनी खिडकीतून उघडी घेतली होती. सफाई कर्मचाऱ्यांनी लगेचच वॉर्डातील ब्रदरला आवाज दिला. त्यानंतर वार्डातील ब्रदर तिथे पोहोचले, ब्रदर यांनी खिडकीतून खाली बघितल्यावर, त्यांना कणसे खाली पडलेले दिसले. लगेचच त्यांनी अतिविशेषोपचार इमारतीतील आरएमओ, सुरक्षा रक्षक यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेची एमएलसी नोंदविण्यात आली, घटनेची माहिती मिळताच तातडीने अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, अतिविशेषोपचार रुग्णालयाचे कार्य अधिकारी, डॉ. सुधीर चौधरी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी घटनास्थळी भेट दिली.