औरंगाबाद- महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंताचे रविवारी सकाळी खासगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. हा अभियंता औरंगाबाद महावितरण विभागातील पहिला बळी ठरला आहे. या अभियंत्याने गेल्या सोळा दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत होते.
कोरोनाशी १६ दिवस लढा देणाऱ्या महावितरण अभियंताचे निधन - corona deaths in Aurangabad
टाळेबंदीच्या काळात चांगले काम केलेल्या महावितरण अभियंत्याचे कोरोनाने निधन झाले आहे. या अभियंत्याला उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्रही सरकारकडून देण्यात आले होते.
औरंगाबाद-जालना परिमंडळात सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अभियंत्याने टाळेबंदीच्या काळात चांगले काम केले होते. त्यामुळे त्यांना उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्रही सरकारकडून देण्यात आले होते. २ ऑक्टोबर रोजी ताप आल्याने त्यांनी स्वत:ची तपासणी करून घेतली.
कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांना कोरोना असल्याचा अहवाल आला. त्यामुळे आई-वडिलांनाही उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी १६ दिवस कोरोनाशी झुंज देत अखेर रविवारी सकाळी अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, सहा वर्षाची मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.