औरंगाबाद- सिल्वर ओकवर जे झाले तो माझ्या आईवर झालेला हल्ला ( Sliver Oak Attack ) होता. ते माझ्या घरी आले होते. ते कशे वागले याला महत्त्व नाही, ते का वागले हे जाणून घ्यायच आहे. तेथील महिलांना मला भेटू द्या, अशी विनंती मी पोलिसांना केली आहे. त्यांना का वेदना होतात हे समजून घेणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे मत राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी व्यक्त केले.
ईडी नुसती कारवाई करत आहे निष्पन्न काही होणार नाही -सध्या राज्यात ईडीचा कारवाईचा विक्रम गाठला आहे. अनिल देशमुख यांच्या मालमत्तेची 105 वेळा झडती घेतली काही मिळाले नाही. आता नसेल तर किती वेळ झडती घेतली तरी काय उपयोग होणार, मात्र अजूनही कारवाई सुरूच आहे. ईडी नुसती कारवाई करत आहे निष्पन्न काही होणार नाही. आम्ही अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) आणि नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.