औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेनंतर ( AIMIM Rally In Aurangabad ) अनेक राजकीय पक्ष सभा घेणार आहेत. त्यामुळे एमआयएम पक्षदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Maharashtra Navnirman Sena ) पेक्षा मोठी सभा घेणार असल्याचं खासदार इमतियाज जलील ( MP Imtiaz Jaleel ) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
AIMIM Rally In Aurangabad : मनसेच्या सभेनंतर एमआयएमदेखील दुपटीने सभा घेणार - खासदार इम्तियाज जलील - औरंगाबाद एमआयएम सभा वक्तव्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेनंतर ( AIMIM Rally In Aurangabad ) अनेक राजकीय पक्ष सभा घेणार आहेत. त्यामुळे एमआयएम पक्षदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Maharashtra Navnirman Sena ) पेक्षा मोठी सभा घेणार असल्याचं खासदार इमतियाज जलील ( MP Imtiaz Jaleel ) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
एआयएमही सभा घेण्याची शक्यता - हिंदुत्वाच्या मुद्दा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत अल्टिमेटम दिला होता. पोलिसांच्या आकडेवारीनुसार 35 हजार कार्यकर्ते या सभेसाठी जमले होते. यावेळी राज ठाकरे यांना दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्षाच्यावतीने देखील या पेक्षा मोठी सभा घेण्याची तयारी दाखवली आहे. मनसेला सभेसाठी परवानगी मिळू शकते, तर मग आमच्या पक्षाला का मिळू शकत नाही, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. एमआयएमची सभा खुर्च्यांवर बसून होणार नाही, असं देखील ते म्हणाले. इतर पक्ष सभा घेण्याची तयारी करत असेल, तर एमआयएम देखील सभा घेईल, असे जलील म्हणाले.
हेही वाचा -Haryanas explosives case : संशयित दहशतवाद्यांचे निघाले पाकिस्तान कनेक्शन, 'हा' होता धक्कादायक कट