महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MP Imtiaz Jalil : उद्धव ठाकरे यांच्या मुस्लिम बांधवांच्या भूमिकेचे स्वागत, मात्र विकासाच काय? - इम्तियाज जलील - CM Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या भाषणातील काही मुद्यांचे स्वागत करतो, मात्र विकासाबाबत काय? महाराष्ट्र कसा पुढे जाणार या बाबत बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता अशी भूमिका एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. ( Imtiaz jalil about CM Uddhav Thackeray Aurangabad Public Meeting )

MP Imtiaz Jalil
इम्तियाज जलील

By

Published : Jun 9, 2022, 12:40 PM IST

Updated : Jun 9, 2022, 1:03 PM IST

औरंगाबाद-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या भाषणातील काही मुद्यांचे स्वागत करतो, मात्र विकासाबाबत काय? महाराष्ट्र कसा पुढे जाणार या बाबत बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता अशी भूमिका एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. ( Imtiaz jalil about CM Uddhav Thackeray Aurangabad Public Meeting )

काही मुद्द्यांचे स्वागत -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम द्वेष नाही अस म्हणले या वक्तव्याचे स्वागत करत असल्याच खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. तर भाजप प्रवक्त्याने प्रेषित पैगंबर बाबत केलेल्या विधानामुळे देशाची नाचक्की झाली. मात्र हे विधान भाजपने केले आहे. त्यामुळे भारत माफी मागणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. ही भूमिका योग्य असून भूमिकेचे आम्ही समर्थन करत असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.

इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

इतर प्रश्नांचे काय? -उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाबरीवर बरंच वेळ घातला. त्या घटनेला आता तीस वर्ष झाली. आता महाराष्ट्राच्या विकासाबाबत काय? त्यावर बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता. त्याच बरोबर शहराच्या पाणी प्रश्नावर बोलताना ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले असे त्यांनी सांगितले. मात्र या गोष्टींशी नागरिकांना घेणे देणे नाही पाणी कधी देणार ते सांगा. तुमच्या बोलण्यावरून पुढील तीन वर्ष तरी पाणी मिळणार नाही, असे दिसत असल्याचे खासदाप इम्तियाज जलील यांनी सांगितले.

हेही वाचा -Uddhav Thackeray : भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली.. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Last Updated : Jun 9, 2022, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details