महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'एक जूनपासून बाजार उघडण्यासाठी व्यापाऱ्यांच्या निर्णयास पाठिंबा'

राज्यातील रिक्षा चालकांना दीड हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. मात्र, 'ब्रेक द चेन' सुरू करून चाळीस दिवस झाले. मात्र, अद्याप कोणालाही मदत झाली नाही. सरकारने कोणत्या एका रिक्षा चालकाच नाव सांगावे. रस्त्यावर कोणीही नसताना रिक्षात बसणार कोण, या रिक्षा सरकारी अधिकाऱ्यांसाठी सुरू ठेवल्या का, असे प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले.

इम्तियाज जलील
इम्तियाज जलील

By

Published : May 25, 2021, 9:15 PM IST

Updated : May 25, 2021, 9:34 PM IST

औरंगाबाद- एक जूनपासून बाजार सुरू करण्याची भूमिका जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची आहे. या भूमिकेला माझे समर्थन आहे. मागील एक महिन्यापासून असलेल्या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. याकाळात बँकेचे हप्ते, वीज बिल, कामावर असलेल्या लोकांचे वेतन सरकार देणार आहे का, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

बातचित करताना प्रतिनिधी

पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनी ज्ञान देऊ नये

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवर येताना भान ठेवावे. निर्बंधाचे नियम सर्वांसाठी समान असायला हवे. मात्र, सध्या राज्यात गरिबांसाठी एक आणि श्रीमंतांसाठी एक नियम लावण्यात आलेले आहे. यात गरिबांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधताना विनाकारण ज्ञान वाटू नये, असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

एका तरी रिक्षा चालकाला मदत केली का दाखवा

राज्यातील रिक्षा चालकांना दीड हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. मात्र, 'ब्रेक द चेन' सुरू करून चाळीस दिवस झाले. मात्र, अद्याप कोणालाही मदत झाली नाही. सरकारने कोणत्या एका रिक्षा चालकाच नाव सांगावे. रस्त्यावर कोणीही नसताना रिक्षात बसणार कोण, या रिक्षा सरकारी अधिकाऱ्यांसाठी सुरू ठेवल्या का, असे प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले.

जनतेसोबत राहणार

औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी 1 जूनपासून व्यवसाय सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. या भूमिकेला आपण समर्थन देत आहोत. आपण जनतेच्या सोबत राहू, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केली. गेल्या काही दिवसात प्रशासनाने व्यावसायिकांवर कारवाई केली. मात्र, त्यांची परिस्थिती कोणी जाणून घेतली का, प्रशासनाचे अधिकारी हे अधिकारशाही गाजवत आहेत. सामान्य माणसांचा विचार कोणीही करत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मी नागरिकांच्या भावनांचा आदर करत जनतेच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांच्यासोबत राहील, अशी भावना खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी वाढ, सामान्यांचे बजेट कोलमडले

Last Updated : May 25, 2021, 9:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details