औरंगाबाद- संसदेमधे तीन तलाकच्या मुद्यावर चर्चा सुरू होती. त्या वेळेस झालेली घटना माध्यमांनी अर्धवट दाखवली. ज्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे बोट दाखवले, त्यावेळी ओवेसी यांनी त्यांना बोट खाली कर, असे उत्तर दिले. मी या घटनेचा साक्षीदार आहे. मीच त्यांचा शर्ट ओढला, असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी औरंगाबाद येथील एमआयएमच्या विजयी रॅली दरम्यान केला.
बोट खाली कर असे ओवेसी शाह यांना म्हणाले; मी साक्षीदार - इम्तियाज जलील - औरंगाबाद
महाराष्ट्र्रातील एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबादेतून निवडून आले आहेत. याच अनुशंगाने आज औरंगाबाद शहरात जलील यांची विजयी रॅली काढण्यात आली होती.
संपादित छायाचित्र
महाराष्ट्र्रातील एमआयएमचे एकमेव खासदार औरंगाबादेतून निवडून आले आहेत. याच अनुशंगाने आज औरंगाबाद शहरात जलील यांची विजयी रॅली काढण्यात आली होती. रॅलीचा समारोप भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.