महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 7, 2019, 4:59 PM IST

ETV Bharat / city

खासदार इम्तियाज जलील हरवले... सामान्य नागरिकाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

गेल्या सात महिन्यात खासदार तालुक्यातच आले नाहीत. ते हरवले असून त्यांना शोधून द्या, असे पत्र औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे...

खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद -वैजापूर तालुक्यातील नागरिकाने, गेल्या सात महिन्यात खासदार इम्तियाज जलील तालुक्यात आलेच नसल्याने ते हरवले असल्याची तक्रार केली आहे. ख्वाजा गरीब नवाज ग्रुप यांच्या तर्फे रिजाउद्दीन शेख यांनी तशा आशयाचे पत्र औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.

खासदार इम्तियाज जलील हरवल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

खासदार हरवलेत त्यांना शोधून द्या....

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी अद्याप कुठेही पिकांचे झालेले नुकसान पाहण्याची तसदी घेतलेली नाही. खासदार म्हणून त्यांनी केंद्रात बाजू मांडणे आणि न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. मात्र इम्तियाज जलील कुठे दिसून येत नसल्याची तक्रार करत, ख्वाजा गरीब नवाज ग्रुप तर्फे रिजाउद्दीन शेख यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.

हेही वाचा... शेतातील नुकसान पाहून शेतकऱ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर आला, अनेक गाव पाण्याखाली गेली. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला, पिकांचे नुकसान झाले. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सरकारी अधिकारी विविध पक्षांच्या नेत्यांनी दौरे केले मात्र यामध्ये खासदार इम्तियाज जलील दिसून आले नाहीत. त्यामुळे ते हरवले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाल्याचे पत्र ख्वाजा गरीब नवाज ग्रुप तर्फे देण्यात आले. इतकेच नाही तर एखाद्या बैठकीत इम्तियाज जलील यांची भेट झाली तर आमच्या समस्या त्यांच्या समोर मांडा, अशी विनंती रियाझउद्दीन शेख यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details