महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अबू आझमी तुम्हीच एमआयएम पक्षात या.! खासदार जलील यांचे निमंत्रण - खासदार जलील यांचे ट्विट

उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम एकूण 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यावरून सपा नेते आझमी यांनी एमआयएमवर टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देताना खासदार जलील यांनी आझमी यांनाच एमआयएममध्ये येण्याचे आवाहन केले आहे.

खासदार जलील यांचे निमंत्रण
खासदार जलील यांचे निमंत्रण

By

Published : Jun 30, 2021, 10:17 AM IST

औरंगाबाद - उत्तर प्रदेश निवडणुकीवरून समाजवादी नेते अबू आझमी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात ट्विटर वाद रंगला आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत एमआयएम रिंगणात उतरणार असल्याने टीका करणाऱ्या अबू आझमी यांना पक्षात येण्याचा सल्ला खासदार जलील यांनी दिला आहे.

अबू आझमी यांची ट्विटरवर टीका-
उत्तर प्रदेश निवडणुकीत एमआयएम पक्षाने शंभर जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अप्रत्यक्षरीत्या भाजपला फायदा होईल, २५ टक्के जागा लढून भाजपला हरवणे शक्य होणार नाही. मतविभाजन होऊन भाजपला फायदा होईल, असे मत अबू आझमी यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.

इम्तियाज जलील यांचे आझमी यांना निमंत्रण -


समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या ट्विटनंतर एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करून आझमी यांना एमआयएममध्ये येण्याचे निमंत्रण दिले. तुम्ही सोबत आले तर आपण सोबत निवडणूक लढू, समाजवादी पक्षाने काय दिले, याचे आझम खान हे एक चांगले उदाहरण आहे, त्यामुळे सेक्युलिरझमचा खोटा बुरखा काढून एक वेळ आपल्या नागरिकांसाठी लढा देऊ, असा टोला देखील जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये केली. त्यामुळे आता हा ट्विटर वाद कसा रंगतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, हे नक्की.

अबू आझमी तुम्हीच एमआयएम पक्षात या.!

उत्तर प्रदेशातील निवडणूक लढवण्याची घोषणा-

उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम एकूण 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे, असा निर्णय पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी 'ट्विटर'वरून जाहीर केली. 'एमआयएम' पक्षाचे सध्या हैदराबाद व्यतिरिक्त महाराष्ट्र विधानसभेत दोन आमदार आहेत. महाराष्ट्रातून एक खासदार निवडून आला आहे. 'एमआयएम'ने बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत 'एमआयएम'चे पाच आमदार निवडून आले आहेत.

सपा स्वबळाच्या तयारीत-

आगामीन निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आघाडी करण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस कुमकुवत असल्याचे सांगत स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details