महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

imtiaz jaleel criticize kangana - कंगना रणौतच्या जागी मी बोललो असतो तर, देशद्रोही ठरवले असते - खासदार जलील - mp imtiaz jaleel criticize kangana

कंगना (kangana ranaut) म्हणते, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर खरे स्वतंत्र्य मिळाले. मग भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे काय? हेच वक्तव्य मी केले असत तर, मला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले असते, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel criticize kangana) यानी 'ईटीव्ही भारतशी' बोलताना दिली.

mp imtiaz jaleel criticize kangana
कंगना रणौत टीका इम्तियाज जलील

By

Published : Nov 17, 2021, 8:22 PM IST

Updated : Nov 17, 2021, 9:48 PM IST

औरंगाबाद - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला अभिनेत्री कंगना रणौतला (kangana ranaut) स्टार कॅम्पेनर बनवायचे आहे. यामुळे चर्चेत राहण्यासाठी स्वातंत्र्याबाबत उलट सुलट वक्तव्य केले जात आहे. कंगना म्हणते, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर खरे स्वतंत्र्य मिळाले. मग भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे काय? हेच वक्तव्य मी केले असत तर, मला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले असते, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील (mp imtiaz jaleel) यानी 'ईटीव्ही भारतशी' बोलताना दिली.

माहिती देताना खासदार इम्तियाज जलील आणि ईटीव्ही भारत प्रतिनिधी

हेही वाचा -500 CR scam : मराठवाड्यात 30-30 नावाचा 500 कोटींचा घोटाळा, बिडकीन पोलिसात पहिला गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut news) स्वातंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य करत असून, यामध्ये हुतात्म्यांसह महापुरुषांबद्दल तिच्याकडून पोस्ट करण्यात आले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले नसून ती 'भीक' होती, तिने म्हटले होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर खरे स्वातंत्र्य मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते.

देशातील गंभीर विषयावर कोणी बोलायला तयार नाही

देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई यासह शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखे गंभीर विषय झालेले आहेत. देशात गंभीर होत चाललेल्या विषयांवर कोणी बोलायला तयार नाही, मात्र सर्वसामान्य नागरिकांचे या विषयावरून लक्ष हटवण्यासाठी कंगना रणौत सारख्या अभिनेत्रीकडून बेताल वक्तव्य करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. अशा कमी वीस महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष देऊ नये, असे मत खासदार इम्तियाज (mp imtiaz jaleel criticize kangana ranaut) यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थींचे किल्ल्यांवर विसर्जनास संभाजी ब्रिगेडचा विरोध, दिले हे कारण..

Last Updated : Nov 17, 2021, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details