महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिल्लोडमध्ये पिसाळलेल्या वानरांचा तरुण शेतकऱ्यावर हल्ला - Monkeys attack news

शेतामध्ये फवारणी करत असणाऱ्या एका तरुण शेतकऱ्यावर पिसाळलेल्या दोन वानरांनी अचानक हल्ला केला आहे. यामध्ये वानरांनी त्याच्या पायाचे लचके तोडल्याने तरुणाच्या पायाला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे.

Intro:सिल्लोड
Intro:सिल्लोड

By

Published : Jul 1, 2021, 4:55 PM IST

सिल्लोड- शेतामध्ये फवारणी करत असणाऱ्या एका तरुण शेतकऱ्यावर पिसाळलेल्या दोन वानरांनी अचानक हल्ला केला आहे. यामध्ये वानरांनी त्याच्या पायाचे लचके तोडल्याने तरुणाच्या पायाला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. यामधील पिसाळलेला वानराने या अगोदर धोत्रा परिसरात सुद्धा महिलांवर हल्ला केल्याची माहिती आहे.

वानरांचा तरुण शेतकऱ्यावर हल्ला

सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील शेतकरी भागवत पाडळे (वय ३०) रा. हा पानवडोद शिवारातील गट क्र. २१० या शेतीमध्ये कपाशीच्या पिकावर फवारणी करत असताना पिसाळलेले दोन वानरांनी बुधवार 30 जून रोजी सकाळी आठ वाजता युवकावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे युवक खूपच घाबरून गेला होता. वानराच्या हल्ल्यात युवकाच्या पायाचे अक्षरशः या वानराने लचके तोडले. त्यामुळे पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. बचावासाठी आरडाओरड केल्यानंतर परिसरामधील काही महिला या तरुणाच्या मदतीला धावत आल्यानंतर वानरांनी तेथून पळ काढला व युवकाला उपचारासाठी पानवडोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार बाजूला असलेल्या धोत्रा गावातील काही महिलांवर सुद्धा या वानरांनी हल्ला केला होता अशी माहिती या युवकांनी दिली आहे.

बंदोबस्त करण्याची मागणी
पिसाळलेल्या वानरांना तात्काळ वन विभागाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी या परिसरातून होत आहे. असे लवकरात लवकर न झाल्यास हे वानर अजून या भागातील शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला करू शकते, असे नागरिकांमधून बोलले जात आहे. पिसाळलेल्या वानरमुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा- Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला

ABOUT THE AUTHOR

...view details