औरंगाबाद- कोरोना संकट आणि शैक्षणिक वर्षाची सुरुवात यामुळे पालकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. सध्या प्रत्यक्ष शाळेत शिकवणी बंद असल्यामुळे सरकार दप्तरी ऑनलाईन शिक्षणाचे फर्माण निघाले आहे. त्याची अंबलबजावणी अनेक शाळेत सुरुही झाली आहे. त्यामुळे इ-क्लासमध्ये उपस्थिती दाखवण्यासाठी पालकांना अतिरिक्त मोबाईल लागत असल्याने जुने मोबाईल रिपेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला १५ ते २० मोबाईल रिपेअरिंगसाठी येत असल्याची माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दुकानदारांनी दिली.
पालकांच्या खिशाला झळ; ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मोबाईल दुरुस्ती, विक्रीचा 'धंदा तेजीत' - मोबाईल दुरुस्तीसाठी औरंगाबादेत पालकांची गर्दी
मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक पालकांच्या पूर्ण पगारी नाहीत. सर्वसाधारण कामगार वर्ग तीन महिन्यापासून घरात बसून आहे. मात्र तरीही इ-क्लासमध्ये उपस्थिती दाखवण्यासाठी पालकांना अतिरिक्त मोबाईल लागत असल्याने जुने मोबाईल रिपेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे.
जून महिना म्हणजे पालकांसाठी पाल्याच्या शैक्षणिक वस्तू आणायची धावपळ असते. त्यासाठी पुन्हा अतिरिक्त खर्च झाल्याने हे दरवर्षीचे गणित यंदा बिघडले आहे. मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक पालकांच्या पूर्ण पगारी नाहीत. सर्वसाधारण कामगार वर्ग तीन महिन्यापासून घरात बसून आहे. आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वस्तू पाल्याला मिळाव्यात म्हणून अनेक पालक प्रयत्नशील असतात. शाळांनी सध्या ई-क्लास सुरु केला आहे. त्यात देखील काही पालक पाल्यांच्या भविष्यासाठी ८ ते १२ हजारांच्या किमतीचे मोबाईल घेण्याला पसंती देत आहेत. ही पण अतिरिक्त झळ असल्याचे अनेक पालकांनी सांगितले.
प्रत्यक्ष शाळेत शिकवण्याची अजून सरकारने मुभा दिली नाही. त्यामुळे अप्लिकेशनच्या मध्यामातून शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. या निर्णयाचा सामनाही पालकांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. अनेकांच्या घरात पाल्यांची संख्या दोन ते तीनच्या वर आहे. परंतु घरात मोबाईल वापर फक्त वडीलच करत आल्याने आणि तीन महिन्यापासून कोणतेही काम नसल्याने मोबाईल उपलब्धतेचा ताण पालकांच्या माथी आला आहे. अनेक पालकांनी तर आपल्या घरातील अडगळीत पडलेले मोबाईल आता रिपेअरिंगसाठी काढले आहेत. त्यांना आता हा रिपेअरिंगचा खर्च या परिस्थित परवडणारा नसला, तरी पाल्याच्या भविष्यासाठी आता त्यांना मोबाईल रिपेअर करणे भाग झाले आहे.