औरंगाबाद :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त औरंगाबाद मनसेतर्फे 54 रुपयांमध्ये एक लिटर पेट्रोल देण्यात आले. नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.
संकल्पना 54 वा वाढदिवस 54 रुपयांना पेट्रोल :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 54 वा वाढदिवस कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. त्यानिमित्ताने क्रांती चौक भागात 54 रुपये लिटर दराने पेट्रोल देण्यात आले. सकाळी 8 ते 9 या काळात प्रत्येकाला एक लिटर पेट्रोल देण्यात आले. महागाई वाढत चालली असून, पेट्रोलचे दर शंभरी पार आहेत. जीवनावश्यक वस्तू असल्याने नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पेट्रोल देण्यात आले आहे. एक दिवस का होईना नागरिकांना दिलासा मिळेल याकरिता हा उपक्रम राबवला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.