राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला अशी माहिती मिळली आहे. मात्र पोलिसांनी अपघात झाला नाही असे सांगितले आहे. मात्र सुत्रांच्या माहितीवरून औरंगाबाद कडे जात असताना अहमदनगरच्या घोडेगाव जवळ 3 गाड्या एकमेकांना धडकल्या. या धडकीमध्ये अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे.
Raj Thackeray Live Update : शेकडो गाड्यांचा ताफासह राज ठाकरे औरंगाबादेत, घोडेगावात ताफ्यातील गाड्यांचा अपघात - raj thackeray aurangabad
19:24 April 30
राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
17:40 April 30
राज ठाकरे औरंगाबादेत दाखल, कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
राज ठाकरे हे औरंगाबादेत दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांचे शहरात जंगी स्वागत केले आहे. ते थेटक्रांती चौक परिसरात दाखल झाले होते. रात्री ते हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मुक्काम करणार आहेत.
16:05 April 30
केडगाव बायपास या ठिकाणी राज ठाकरे हे जेवण्यासाठी थांबणार
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नगर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. औरंगाबादला जाताना ते नगरच्या एसटी बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी थांबले होते. राज ठाकरे पुण्यावरून औरंगाबाद कडे जात असून नगर शहरातील केडगाव बायपास या ठिकाणी राज ठाकरे हे जेवण्यासाठी थांबणार आहेत. जेवण करून पुढे ते औरंगाबादला रवाना होणार आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
14:36 April 30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शेकडो गाड्यांचा ताफासह अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत. ते माळीवाडा बसस्थानकाजवळ त्यांचे मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.
11:39 April 30
Raj Thackeray Live Update : संभाजी महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन
औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल शंभरहून ( Raj Thackeray left Pune for Aurangabad ) अधिक गाड्यांचा ताफा घेऊन पुण्याहून औरंगाबादच्या ( Raj Thackeray Aurangabad Rally News ) दिशेने निघाले आहेत. तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद ( Raj Thackeray Blessings from Priest pune ) घेतल्यानंतर पुणे शहरातून ( Raj Thackeray Aurangabad pune News ) राज ठाकरे हे औरंगाबादच्या दिशेने निघाले आहेत. वाटेत येताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.