औरंगाबाद - वारिस पठाण ही निजामाची 'नाजायज औलाद' असल्याची टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली. वादग्रस्त विधानाविरोधात औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांनी वारिस पठाण यांची तिरडी काढून निषेध व्यक्त केला.
वारिस पठाणांचा मनसेकडून खरमरीत समाचार, खैरेंवरही डागली तोफ - मनसे नेते प्रकाश महाजन न्यूज
औरंगाबादमध्ये एमआयएम नेते वारिस पठाण यांच्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. औरंगाबादच्या क्रांतिचौकात वारिस पठाण यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वारिस पठाणवर कारवाई व्हायला हवी. मात्र, तीन पक्षांचे सरकार कारवाई करेल असे वाटत नाही. शिवसेनेचे माजी खासदार यांनी आता श्रावणात दाढी न वाढवता नियमित दाढी वाढवावी आणि त्याला मेहंदी लावावी. त्यापेक्षा आता वेगळं काही ते करू शकणार नाहीत, अशी टीकाही प्रकाश महाजन यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर केली.
औरंगाबादमध्ये एमआयएम नेते वारिस पठाण यांच्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. औरंगाबादच्या क्रांतिचौकात वारिस पठाण यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वारिस पठाण यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. देशातील इम्तियाज जलील आणि ओवैसी हे दोन खासदार व्यासपीठावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. हा पक्ष रझाकाराची औलाद असलेला पक्ष आहे. त्यावेळी त्यांची अशीच भाषा होती आताही तीच आहे, आम्ही मोडून काढू. तसेच वारिस पठाणांच्या भाषणांवर महाराष्ट्रात बंदी आणावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तीन पक्षाचे सरकार वारिस पठाणांवर कारवाई करणार नाही, असे म्हणत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर मनसेच्या नेत्यांनी टीका केली.