महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray Letter : रझाकार आणि सजाकार दोघांचा बंदोबस्त मनसे करेल; राज ठाकरेंचा इशारा - राज ठाकरे यांचे खुले पत्र

मराठवाडा मुक्तसंग्राम दिनानिमित्ताने (Marathwada MuktiSangram Din 2022) विजयस्तंभाजवळ दरवर्षी सकाळी नऊ वाजता होणारा शासकीय कार्यक्रम आज सकाळी सात वाजताच घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी सकाळी ध्वाजारोहण केले. यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने खुले पत्र लिहिले आहे.

mns chief raj thackeray
राज ठाकरे

By

Published : Sep 17, 2022, 1:02 PM IST

औरंगाबाद -मराठवाडा मुक्तसंग्राम दिनानिमित्ताने (Marathwada MuktiSangram Din 2022) विजयस्तंभाजवळ दरवर्षी सकाळी नऊ वाजता होणारा शासकीय कार्यक्रम आज सकाळी सात वाजताच घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी सकाळी ध्वाजारोहण केले. यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावरून राजकारण सुरू झाले आहे. यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने खुले पत्र लिहिले आहे.

राज ठाकरेंचा संभाजीनगरकरांसाठी पत्र - राज ठाकरेंनी खुले पत्र लिहून त्यातून आपली भूमिका मांडली आहे. माझे तर म्हणणे आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये. तसेच संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत, तर आधुनिक सजाकारही येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे सजाकार. अर्थात, लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेलच, असेही राज ठाकरे या पत्रात म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचा एमआयएमवर निशाणा - मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी फारसे बोलले का जात नसेल? अर्थात रझाकारांचे लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचे सरकार कित्येक वर्षं राज्यात होते. त्यामुळे हे होणे स्वाभाविक होते. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैवं असे की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी या पत्रातून अप्रत्यक्षपणे एमआयएमला लक्ष्य केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details