महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संभाजीनगरच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी खैरेंची गाडी अडवली

"औरंगाबादेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने शहराच्या नामांतराचा मुद्दा सुरु केला. मात्र गेली तीस-बत्तीस वर्ष फक्त हा मुद्दा निवडणुकी पुरता मर्यादित राहिला."

चंद्रकांत खैरे
चंद्रकांत खैरे

By

Published : Feb 4, 2021, 4:56 PM IST

Updated : Feb 4, 2021, 6:36 PM IST

औरंगाबाद - औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच वाहन अडवत नामांतर करा, अशा आशयाचे पत्रक त्यांच्या अंगावर भिरकावली. औरंगाबादच्या क्रांती चौकात मनसे कार्यकर्त्यांनी वाहन अडवत शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

संभाजीनगरच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी खैरेंची गाडी अडवली
शिवसेनेला पत्करली लाचारी-

औरंगाबादेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने शहराच्या नामांतराचा मुद्दा सुरु केला. मात्र गेली तीस-बत्तीस वर्ष फक्त हा मुद्दा निवडणुकी पुरता मर्यादित राहिला. गेल्यावेळी भाजप शिवसेना युती सरकार होती. त्यावेळी देखील शिवसेनेने शहराच नामांतर करून घेतलं नाही. आता महाविकास आघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही अद्याप शहराचं नाव संभाजीनगर केलेलं नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी केलाय.

मनसेने दिलं होतं 26 जानेवारीचा अल्टिमेटम-

औरंगाबाद शहराचा नामांतर करण्यासाठी मनसेने शिवसेनेला 26 जानेवारीचा अल्टिमेटम दिला होते. त्यानंतर आता आम्हीच नामांतर करू, अशी घोषणा मनसेतर्फे करण्यात आली. त्यानुसार आंदोलनाचा भाग म्हणून क्रांतिचौक भागात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी अडवत त्यांच्या अंगावर निषेधाचे पत्र उधळली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करत नाही त्याबद्दल शिवसेनेचा निषेध करत आज आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची गाडी अडवली. प्रसंगी उद्या मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, असा इशारा मनसेनेतर्फे देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे पाच तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यामुळे मनसे मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणार का? हा खरा प्रश्‍न निर्माण होत आहे.

शिवसेना संभाजीनगर'साठी बांधील-

खैरे यांच्या अंगावर मनसेने उधळलेले पत्रक खैरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर टाकत, आंदोलनाची खिल्ली उडवली.
शहराचं नाव लवकरच संभाजीनगर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच श्रेय लाटण्यासाठी मनसे असं काही करत आहे. मनसेचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. शिवसेना संभाजीनगर साठी बांधील असल्याचे खैरे यांनी सांगितलं.

हेही वाचा-'वीजबिलासंदर्भात भाजपाचे आंदोलन केवळ राजकारण'

Last Updated : Feb 4, 2021, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details