महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Udaysingh Rajput Dance : उदयसिंह राजपुत "मैं हू डॉन" गाण्यावर थिरकले; पाहा व्हिडिओ - Maharashtra Political Crisis

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांचा लग्नात नाचतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत ( Udaysingh Rajput Dance ) आहे. त्यांच्या मतदार संघातील एका लग्नात ते गेले असताना त्यांनी मनसोक्त डान्स केला आहे.

Video viral
व्हिडिओ व्हायरल

By

Published : Jun 27, 2022, 12:01 PM IST

Updated : Jun 27, 2022, 12:36 PM IST

औरंगाबाद - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांचा लग्नात नाचतानाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत ( Udaysingh Rajput Dance ) आहे. त्यांच्या मतदार संघातील एका लग्नात ते गेले असताना त्यांनी मनसोक्त डान्स केला आहे. त्यामुळे राजपूत पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत.

मै हू डॉन, गाण्यावर नाचले राजपूत... -कन्नड मतदार संघाचे आमदार उदयसिहं राजपूत यांनी शिंदे गटासोबत न जाता उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. रविवारी कन्नड येथे एका विवाह सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आल होतं. त्यात ते सहभागी झाले. नवरा मुलाने वरातीत नाचण्याचा आग्रह केला असताना "मै हू डॉन" हे गाणं खास त्यांच्यासाठी लावण्यात आलं. त्यावेळी सर्व ताण- तणाव विसरून राजपूत यांनी बेभान डान्स केला आहे. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढला. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल

राजपूत यांना पन्नास कोटींची ऑफर? -एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आपल्याला पन्नास कोटींची ऑफर असल्याचा आरोप उदयसिंह राजपूत यांनी केला आहे. दोन गाड्या भरून पैसे आले होते. मात्र, मला पद मिळालं नाही तरी चालेल. मात्र, गद्दार असा डाग नको. मेलो तरी चालेल पण डाग नको, असे मत उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-VIDEO - गंगानगरमध्ये बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी तीन तरुणांनी मारल्या उड्या, पाहा बचावाचा व्हिडिओ

Last Updated : Jun 27, 2022, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details