औरंगाबादआजकाल सिनियारिटी काही राहिली नाही राव, अतुल सावे यांच्या वडिलांसोबत राजकारणात होतो. मात्र अतुल सावे आले पहिले राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री झाले. जरा आमच्याकडे पण पहा की जरा अशी टोलेबाजी त्यांनी करत आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले आहे. असे वक्तव्य करुन संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. एकनाथ शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यात औरंगाबादेतून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट Mla Sanjay Shirsat यांचा निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी शिरसाट यांचा पत्ता कट झाला. तेव्हापासून ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाराजी दाखवून देत आहेत.
गेल्या आठवड्यात केले होते ट्विटगेल्या आठवड्यात त्यांनी ट्विटरवर आमचे कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असा उल्लेख असलेला व्हिडीओ टाकला होता. यावर त्यांच्यासह अनेकांना खुलासा करावा लागला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 15 ऑगस्टला शुभेच्छा देणारे बॅनर लावताना शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर Mla Sanjay Shirsat असा केला होता. शिंदे सरकारने शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करूनही शिरसाट यांनी फक्त संभाजीनगर लिहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर 20 ऑगस्टलाही त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी बोलून दाखवली होती.