औरंगाबाद- काँग्रेसच्या मनात असते तर त्यांनी केव्हाच आरक्षण देऊन टाकले असते. मात्र, मनात नाही ते कसे देणार, असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष आणि फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसवर केला. दहा वर्षे सत्तेत असताना त्यांनी कायदा लागू करून आरक्षण का नाही दिले असा जाब त्यांनी यावेळी विचारला.
काँग्रेसच्या मनात असते तर केव्हाच आरक्षण दिले असते, हरिभाऊ बागडेंची टीका भाजप नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारोह सोहळ्यात हरिभाऊ बागडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महा-विकास आघाडी सरकारला घेरलं. आरक्षण देण्यासाठी योग्य बाजू मांडायला हवी होती. मात्र, ती बाजू न मांडता, थेट केंद्राला दोष देण्याचे काम हे सरकार करत आहे. मात्र, कायदा हा राज्याचा आहे. न्यायालयात केंद्र सरकार पार्टी म्हणून नव्हती. त्यामुळे केंद्राचा यात काय सहभाग? असा प्रश्न हरिभाऊ बागडे यांनी राज्य सरकारला विचारला.2004 ते 2014 काँग्रेस सत्तेत होती. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात त्यांची सत्ता होती. इतकंच नाही तर केंद्रातही काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात त्यांना जर आरक्षण द्यायचे असते तर त्यांनी केव्हाच देऊन टाकले असते. मात्र, त्यांनी त्यावेळी तसे केले नाह, कारण त्यांना आरक्षण मुळात द्यायचंच नव्हतं. भाजपने मात्र हे आरक्षण देऊन दाखवलं आणि हेच आपण लोकांना सांगण्यात कुठेतरी कमी पडतो आहे. आरक्षण भाजपने दिले असताना आता योग्य वेळी राज्य सरकारने आरक्षणाबाबत न्यायालयात योग्य भूमिका मांडणे गरजेचे होते. मात्र, ही भूमिका मांडताना सरकार कमी पडले. त्यात यात केंद्राला दोष देऊन सरकार मोकळे होण्याचा पाहत आहे. मात्र, केंद्राचा यात काय सहभाग आहे? हा खरा प्रश्न आहे. न्यायालयात केंद्राचा कुठेही उल्लेख नाही कुठे किंवा कुठेही सहभाग नाही ते पार्टी नाहीत. त्यामुळे केंद्राला का दोष दिला जातोय हा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र, हे आरक्षण टिकवण्यासाठी आता आपण निश्चित प्रयत्न करू, असे हरिभाऊ बागडे यांनी सांगत महाविकासआघाडीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली.