औरंगाबाद - शेतकऱ्यांसाठी सदैव कष्ट करणार्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यंदाच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट दिसून आले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसोबत पोळा सण साजरा केला. त्यांनी पिंपळदरी, वसई, हळदा, वसई वाडी या पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांसोबत साजरा केला पोळा - औरंगाबाद
महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसोबत पोळा सण साजरा केला.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सर्वांनी लसीकरण करून खबरदारी घ्यावी. कोरोनावर आपण नक्कीच मात करू. उत्साह, आनंद , चैतन्य , समृद्धी घेऊन येईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व्यक्त केला.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पोळा उत्साहात साजरा
तालुक्यातील हट्टी, अनवी, भराडी, अजिंठा, गोलेगाव, घाटनान्द्रा, अंभई, निल्लोड, केरांला, आदी सह इतर गावात पोळा सण साध्या पद्धतीने साजरा केलेला आहे.बळीराजांनी आपल्या सजवलेल्या बैलाची पुजा करुण शांततेत घरोघरी नैवेद्य खाण्यासाठी नेले.
हेही वाचा -अकोला: पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू