औरंगाबाद -राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या काल (शनिवारी) झालेल्या मुंबईतील भाषणावर विविध राजकीय नेत्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या सभेवर अनेक जण बोलत आहेत, आम्हाला फरक पडत नाही, करारा जवाब देणारे बोलतील त्यानंतर आम्ही उत्तर देऊ. आमचे सरकार विकासाचे काम जोरात करत आहे. त्यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही, अस मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde ) यांनी व्यक्त केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
Minister Eknath Shinde Aurangabad : 'मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांना करू द्या, आम्हाला फरक पडत नाही' - एकनाथ शिंदेची राणा दाम्पत्यावर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या सभेवर अनेक जण बोलत आहेत, आम्हाला फरक पडत नाही, करारा जवाब देणारे बोलतील त्यानंतर आम्ही उत्तर देऊ. आमचे सरकार विकासाचे काम जोरात करत आहे. त्यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही, अस मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde ) यांनी व्यक्त केले आहे.
राणा दाम्पत्य आता बिकेसींवर जाणार, याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी टीका केली. एकदा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम त्यांनी पहिला, आम्हाला हनुमान चालीसा आणि हिंदुत्व शिकवू नये. त्यांनी श्रद्धा ठेवत हनुमान चालीसा म्हणावी, आम्हाला काही अडचण नाही. त्यांनी खुशाल श्रद्धेने आपल्या घरी हनुमान चालीसा म्हणावी, अस मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. औरंगजेब स्वराज्याचा शत्रू आहे, ओवेसीची वागणूक हिंदूना डीवचणारी आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, ओवेसी कुणासाठी नाटक करतो माहीत नाही. मात्र हा स्वराज्याचा शत्रू आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री आज धर्मवीर चित्रपट पाहणार, तो आनंद दिघे यांची कारकीर्द आणि कडवे हिंदुत्व यावरचा जाज्वल्य चित्रपट आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.