औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील हे माझेच पाप आहे, आज जर ते आमच्यावर उलटणार असेल तर त्याचा शेवटचा मंत्र आमच्याकडे आहे, तो आम्ही वापरू आणि त्यांना घरी पाठवू, असा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाणी परिषदेत लगावला.
- मुख्यमंत्र्यांना एमआयएमसह अन्य पक्षांनी केला विरोध -
हेही वाचा -मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (17 सप्टेंबर) औरंगाबाद शहरात येणार आहेत. त्यावेळी मराठवाड्याचा विकास (न) केल्यामुळे एमआयएम सत्कार करुन उपरोधिक आंदोलन करणार आहे, त्याबरोबर मनसे त्यांच्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका करत, असे आंदोलन करून हे लोकं मराठवाड्याच्या विकासाची गती कमी करू पाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाला घाबरणार नाहीत, ते येतील आणि कामांचा शुभारंभ करणार, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील यांनी कोणता विकास केला? ते पाच वर्षे आमदार तर आता खासदार आहेत तर महानगरपालिकेत 26 नगरसेवक आहेत. मग त्यांच्या वार्डात काय काम झाले? याचा अहवाल त्यांना द्यावा लागणार आहे, अशी टीका देखील अब्दुल सत्तार यांनी केली.
- दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी घरचे प्रश्न सोडवावेत -