महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमची मुंबईत रॅली, औरंगाबादहून शेकडो वाहने रवाना - औरंगाबाद हमखास मैदान

मुस्लिम समाजाला आरक्षण (Muslim Reservation) देण्याच्या मागणीसाठी एमआयएमने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी मुंबईत रॅलीचे (MIM Rally In Mumbai) आयोजन करून मुस्लिम आरक्षणासाठी एकजूट दाखवण्यात येणार आहे. औरंगाबादहून खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाहने मुंबईकडे रवाना झाली आहेत.

मुस्लिम आरक्षण
मुस्लिम आरक्षण

By

Published : Dec 11, 2021, 11:15 AM IST

औरंगाबाद - मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim Reservation) मुद्द्यावरून एमआयएमची कार रॅली मुंबईकडे (MIM Car Rally Mumbai) निघाली आहे. मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वामध्ये ही कार रॅली काढण्यात आली आहे. चांदिवलीमध्ये एमआयएमची सभा (MIM Rally In Chandivali) होणार असून, असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांची उपस्थिती असेल, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

ऐन वेळी गाड्या आणण्यास मनाई
औरंगाबादच्या हमखास मैदान (Hamkhas Maidan Aurangabad) येथून सकाळी गाड्यांचा ताफा मुंबईकडे निघाला. मात्र रात्री जास्त गाड्या आल्यास कारवाई होईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता. चांदिवली येथे सभा घेण्यास पोलिसांची अनुमती मिळाली आहे, असे असताना अचानक परवानगीमध्ये बदल करणे आम्हाला मान्य नाही. आम्ही आमचं नियोजन पूर्वीच केलेल आहे. त्यामुळे काही गाड्या रात्री तर, काही गाड्या सकाळी असा वेळ बदलून आम्ही मार्गस्थ केल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरकारपर्यंत आमच्या मागण्या पोहचवू असं मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं.

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमची मुंबईत रॅली, औरंगाबादहून शेकडो वाहने रवाना
या आधी दोनदा नाकारली परवानगीमुस्लिम आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. लवकरच मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी एमआयएम पक्षातर्फे भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. आगामी काळात मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारू, असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला होता. तर नोव्हेंबर महिन्यात रॅली काढू आणि मुंबईला जाऊ अशी भूमिका खा. जलील यांनी स्पष्ट केली होती. मात्र पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारली होती. त्यामुळे आम्ही तिसऱ्यांदा रीतसर परवानगी घेऊन ही रॅली काढत आहोत. मुस्लिम समाजाला आरक्षण हव आहे, त्यांना त्यांचा हक्क हवा आहे, यासाठी ही रॅली काढत असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.कायगाव येथे पोलिसांनी अडवली रॅलीऔरंगाबादहून सकाळी वाहनावर तिरंगा झेंडा लावून निघालेली एमआयएमची रॅली (Tiranga Flag Rally) कायगाव येथे पोलिसांनी अडवली. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पहिले बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे (Kakasaheb Shinde) यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली पुण्याकडे निघत होती. मात्र कायगाव पुलावर पोलिसांनी ही रॅली अडवली. त्यामुळे खासदार जलील संतप्त झाले होते. मात्र काही वेळाने पोलिसांनी त्यांचा ताफा सोडला आणि पुन्हा रॅली मुंबईकडे निघाली.

ABOUT THE AUTHOR

...view details