महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पिण्याच्या पाणीप्रश्नी महापालिकेसमोर उंट उभा करत एमआयएमचे आंदोलन - aurangabad water problem

दहा दिवसांतून एकदा पाणी द्यायला शहरात उंट राहत नाहीत, माणसे राहतात, असे म्हणत त्यांनी आंदोलन केले. तसेच चार दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर येत्या आठवड्यात अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

औरंगाबाद एमआयएम आंदोलन
औरंगाबाद एमआयएम आंदोलन

By

Published : May 28, 2021, 7:23 PM IST

Updated : May 28, 2021, 7:38 PM IST

औरंगाबाद - शहरातील अनेक भागात दहा-दहा दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. याविरोधात एमआयएमने चक्क उंट घेऊन महापालिकेसमोर अनोखे आंदोलन केले. दहा दिवसांतून एकदा पाणी द्यायला शहरात उंट राहत नाहीत, माणसे राहतात, असे म्हणत त्यांनी आंदोलन केले. तसेच चार दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर येत्या आठवड्यात अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पालिकेसमोर आणला उंट

एमआयएमचे शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे कार्यकर्ते दुपारी एक उंट घेऊन मनपा मुख्यालयासमोर पोहोचले. या उंटाला मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उभे करत औरंगाबाद में उंट नही इन्सान रहते हैं, स्मार्ट सिटी नही पिने का पाणी चाहिए, महापालिका है या महाभ्रष्ट पालिका है, लाइनमन म्हणतो मला नगद पाहिजे, असे फलक हातात घेत घोषणाबाजी केली. त्यानंतर आदोलकांनी मनपा प्रशासनाला एक निवेदन दिले.

पाण्यासाठी पालिकेला इशारा

शहरातील पाणीप्रश्न बिकट झाला आहे. शहरवासीयांकडून मनपा वर्षाला चार हजार रुपये पाणीपट्टी वसूल करते. तरीदेखील सईदा कॉलनी, आरिफ कॉलनी, पैठण गेट, खोकडपुरा, जयभीम नगर वॉर्डात दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो आहे. काही भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

'कोविडच्या नावाखाली इतर समस्यांकडे दुर्लक्ष करू नका'

कोविडच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. दहा दहा दिवसांनंतर नागरिकांना पाणी मिळते. पाणीपुरवठ्यासारख्या नागरिकांच्या अत्यावश्यक प्रश्नाची मनपा अधिकारी दखल घेत नाहीत. मात्र, आता हे खपवून घेतले जाणार नाही. हा प्रश्न सुटला नाही तर पुढील आठवड्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा एमआयएम शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी यांनी दिला. आंदोलनात वाजीद जहागीरदार, सलीम शेख, खान रमीज राजा, मोहम्मद दस्तगीर, मोहम्मद जावीद, शोएब शेख, सुभाष शिंदे यांचा सहभाग होता.

Last Updated : May 28, 2021, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details