महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vidhan Parishad Election 2022 : एमआयएमचे 'मिशन हंडोरे'; विधानपरिषदेला पाठींबा देणार?

काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे ( Congress Candidate Chandrakant Handore ) यांना आपली पसंती आहे. मात्र, आमच्या दोन्ही उमेदवारांना विचारून निर्णय घेऊ, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं ( MP Imtiaz Jalil ) आहे.

By

Published : Jun 18, 2022, 3:19 PM IST

MP Imtiaz Jalil
MP Imtiaz Jalil

औरंगाबाद - राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला मतदान केल्यावर पुन्हा एकदा विधान परिषदेत ( Vidhan Parishad Election 2022 ) देखील मदत करू शकतो, अशी शक्यता एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी वर्तवली आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे ( Congress Candidate Chandrakant Handore ) यांना आपली पसंती आहे. मात्र, आमच्या दोन्ही उमेदवारांना विचारून निर्णय घेऊ, असेही जलील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात दलित मत मिळवण्यासाठी एमआयएमची ही रणनीती तर नाहीना, असा सवालही उपस्थित होत आहे.

'हंडोरेंचे दलितांसाठी काम' - इम्तियाज जलील म्हणाले की, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दलित बांधवांसाठी काम केले आहे. त्यांना प्रत्यक्ष कधी भेटलो नाही. पण, त्यांच्या कार्याबद्दल ऐकलं आहे. त्यामुळे अशा नेत्याला संधी द्यावी या करिता आपण वैयक्तिक रित्या त्यांना मतदान करण्याच्या विचारात आहे. राज्यसभेला देखील इम्रान प्रतापगढी यांना आम्ही मतदान दिलं. मुस्लिम चेहरा खासदार म्हणून पुढे यावा म्हणून आम्ही पुढे आलो. तसंच चांगल काम करणाऱ्या हंडोरे यांना देखील मतदान कराव, असा विचार आहे. मात्र, याबाबत आपण पक्षाची भूमिका आणि दोन आमदारांशी चर्चा करू, असे जलील यांनी म्हटलं.

इम्तियाज जलील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

दलित मतांवर एमआयएम चा डोळा? - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमने वंचित बहुजन आघाडी सोबत युती करत दलित आणि मुस्लिम मतदारांचे एकीकरण करत मतदारांना वेगळा पर्याय दिला. परंतु, विधानसभा निवडणुकीत मिळाळेल्या अपयशानंतर समीकरण बिघडले आणि दोन्ही पक्षांनी वेगवेगळा मार्ग निवडला. एमआयएम पक्षाकडे मुस्लिम पक्ष म्हणून पाहिजे जाऊ लागले. मात्र, आता आगामी मनपा आणि पुढील निवडणुकींमध्ये मुस्लिम मतांसह दलित मत आवश्यक आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी हंडोरे कार्डचा वापर एमआयएम करू पाहत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा -Legislative Council Elections: विधान परिषद निवडणूक घडामोडी वाढल्या काँग्रेस आमदारांची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details