महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MIM Gharkul Scheme Banner : घरकुल योजना फसवी; एमआयएमची पोस्टर बाजी, तर औरंगाबाद मनपाची कारवाई - औरंगाबाद एमआयएम पोस्टर बाजी

घरकुलयोजनेवरून एमआयएमने पोस्टर बाजी ( MIM Gharkul Scheme Banner ) करत ही योजना फसवी असल्याचे बॅनर लावले. या योजनेच्या नावाखाली औरंगाबादेतील सर्वसामान्य जनतेची पंतप्रधान मोदींनी चेष्टा केली, असा आरोप खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी केला आहे.

Auranagabad
Auranagabad

By

Published : Feb 8, 2022, 3:45 AM IST

Updated : Feb 8, 2022, 4:22 AM IST

औरंगाबाद - घरकुलयोजनेवरून एमआयएमने पोस्टर बाजी ( MIM Gharkul Scheme Banner ) करत ही योजना फसवी असल्याचे बॅनर लावले. तर दुसरीकडे महानगर पालिकेने ते बॅनर जप्त करून फाडून टाकले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. योजनेच्या नावाखाली औरंगाबादेतील सर्वसामान्य जनतेची पंतप्रधान मोदींनी चेष्टा केली, असा आरोप खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी केला आहे.

व्हिडीओ

'ही सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांची चेष्टा' -

मार्च 2022ला पंतप्रधान आवास योजनेची मुदत संपणार असून केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनता व कार्यपद्धतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. पंतप्रधान घरकूल योजना म्हणजे ’सपनो का घर, सपने मे ही मिलेगा’ अशी टीका त्यांनी केली. शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक गोरगरीब लोकांना सर्व सोयीसुविधायुक्त स्वत:ची पक्की घरे मिळणार असल्याचे जाहीर करुन कोट्यावधी रुपयांचे होर्डिंग व जाहिराती करून शासकीय पैशांचा गैरवापर मोदींनी केला. ही सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांची चेष्टा आहे, याचा लोकसभेत थेट नरेंद्र मोदींनाच जाब विचारणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

'शहरात योजनेचा फायदा नाही' -

देशातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च 2022पर्यंत सर्वांना जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर पंतप्रधान आवास योजनेतंर्गत देणार असल्याचे घोषित केले होते. स्वत:ची घरे मिळणार या आशेने 2016 मध्ये औरंगाबाद शहरातील 80815 गोरगरीब नागरीकांनी कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने महानगरपालिकेकडे अर्ज सादर केले. गेल्या सात वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाने फक्त 355 लाभार्थी म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी लाभार्थीयांना घर दुरुस्तीसाठी लाभ दिला. ही बाब शहरासाठी लाजीरवाणी असून घरकुल योजने संदर्भात केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी लावले.

शहरात पोस्टर बाजी -

शहरात घरकूल योजनेबाबत एमआयएमने रविवारी शहरभर बॅनर बाजी केली. 'घरकुल' नाही 'फेककुल' योजना, 'सपनो का घर सपने में ही मिलेगा', असे बॅनर लावण्यात आले. एमआयएमने हर्सूल टी पॉइंट, कलेक्टर ऑफिस सर्कल, रोशन गेट, दमडी महल, भडकल गेट, सिटी क्लब सर्कल आमखास मैदान समोर या ठिकाणी बॅनर झळकले आहे. त्यांनतर मनपाने विनापरवानगी बॅनर लावल्याच सांगत रात्रीतून बॅनर काढून फाडून टाकले.

हेही वाचा -Praveen Darekar Critisized Congress : मोदींच्या भाषणाने काँग्रेसची आगपाखड होणे स्वाभाविक - प्रवीण दरेकर

Last Updated : Feb 8, 2022, 4:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details