महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादच्या पाणी समस्येबाबत पंतप्रधानांनी लक्ष घालावे-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( MH governor on water issue ) यांनी ‘मोदी है तो मुमकिन है’ हे सांगत औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न नक्की मार्गी लागेल, असा विश्वास वक्तव्य केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष ही मागणी केल्याने शिवेसनेत संतापाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ जूनला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांनी देहुमध्ये हजेरी लावली होती.

MH governor
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By

Published : Jun 15, 2022, 10:23 AM IST

Updated : Jun 15, 2022, 11:18 AM IST

औरंगाबाद- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न ( Aurangabad water issue ) चांगलाच पेटणार आहे. औरंगाबादची पाणी समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधानांनी लक्ष ( Bhagatsingh Koshyari on Aurangabad water issue ) घालावे. औरंगाबादमध्ये पाच-सात दिवसांनी पाणी येते, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( MH governor on water issue ) यांनी ‘मोदी है तो मुमकिन है’ हे सांगत औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न नक्की मार्गी लागेल, असा विश्वास वक्तव्य केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष ही मागणी केल्याने शिवेसनेत संतापाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ जूनला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांनी देहुमध्ये हजेरी लावली होती.

कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करा-मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद ( Aurangabad Water Issue ) शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray Meeting On Aurangabad Water Issue ) यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना २ जूनला खडसावले. सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्यरीतीने पाणी द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे -औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी रेंगाळणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे. शहराच्या पारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी मिळविण्यासाठी वनविभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. तसेच औरंगाबाद शहराच्या १६८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा-मराठवाडा वॉटर ग्रीडला राज्य शासनाची तत्वतः मान्यता

हेही वाचा-औरंगाबादमधील जलसाठ्यात १५ टक्क्याने वाढ; जायकवाडी धरणात ५२ टक्के पाणीसाठा

हेही वाचा-Cm Uddhav Thackeray : फडवणीस म्हणतात गधाधारी, आम्ही 'गधा' सोडलायं; उद्धव ठाकरेंचा टोला

Last Updated : Jun 15, 2022, 11:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details