महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादेत व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध - corona

मागील वर्षी हा आजार नवीन होता. आरोग्य यंत्रणा सज्ज नव्हती. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता. त्यावेळी बंदमुळे मोठं नुकसान झालं. मात्र आता आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आजारासोबत एक वर्षाची लढाई लढलो आहोत. त्यामुळे आता बंद करण्याऐवजी काही निर्बंध लावून व्यापार सुरू ठेवायला पाहिजे होता असं व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

औरंगाबादेत व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध
औरंगाबादेत व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

By

Published : Mar 30, 2021, 5:03 PM IST

औरंगाबाद : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे आमचं अर्थचक्र बिघडत असून अडचणींमध्ये वाढ होत असल्याने, आमचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे औरंगाबादमधील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात असणार दहा दिवसांचा बंद
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने 31 मार्च ते 9 एप्रिल या काळात लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सकाळी 8 ते दुपारी 12 या काळात अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामुळे व्यापारी उध्वस्त होणार असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी हा आजार नवीन होता. आरोग्य यंत्रणा सज्ज नव्हती. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता. त्यावेळी बंदमुळे मोठं नुकसान झालं. मात्र आता आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आजारासोबत एक वर्षाची लढाई लढलो आहोत. त्यामुळे आता बंद करण्याऐवजी काही निर्बंध लावून व्यापार सुरू ठेवायला पाहिजे होता असं व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी औरंगाबादेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधला
सायंकाळपर्यंत बाजारपेठ उघडी ठेवानव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांनुसार किराणा दुकाने, दूध, भाजी, वर्तमानपत्र विक्रीसाठी काही तासांसाठी मुभा दिली आहे. मात्र इतर व्यवसायांबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. व्यापार बंद केला तर मोठं नुकसान व्यावसायिकांना सहन करावं लागतं. दुकानाचे भाडे, वीजबिल, कामावर असलेले कर्मचारी यांचा पगार द्यायचा कसा? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे पूर्ण बंद न करता एक दिवसआड दुकान उघडणे, दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत दुकान उघडणे असे काही निर्बंध लावून व्यवसायास परवानगी द्यायला हवी. कोरोना आजार घातक असला तरी व्यापार बंद न करता देखील उपाययोजना होऊ शकते. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने विचार करावा अशी मागणी औरंगाबादच्या व्यापारी आघाडीचे मुकेश जैन आणि विनोद मंडलेचा यांनी केली आहे. यासंदर्भात औरंगाबादेतील व्यापारी आघाडीचे मराठवाडा सहप्रमुख मुकेश जैन, जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा आणि संदीप मुथा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details