औरंगाबाद -निजाम काळातील इतिहासाच्या आठवणी जागवणारे क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारकाचे सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून शिवजयंतीच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. हा राज्यातील सर्वात मोठे स्मारक असणार आहे. (Memorial of Monument of Chhatrapati Shivaji Maharaj ) याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी-
चौकात गडकिल्याचे प्रतीक उभं करण्याचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुशोभीकरण करताना अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये महाराजांच्या स्मारकासोबतच गड-किल्ल्यांचा देखील समावेश केला असल्याने सौंदर्यात भर पडली आहे. याबाबत आखणी करण्यात आल्याचा मत वास्तुविशारद धीरज देशमुख यांनी व्यक्त केला. (Statue Of Chhatrapati history at Kranti Chowk) औरंगाबाद शहराला ऐतिहासिक अशी असा वारसा आहे. त्यामुळे विशेष आणि गड-किल्ल्यांचा समावेश असणारा देखावा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले गेले. त्यातूनच देवगिरी किल्ल्यासारखा किंवा त्याच्यासारखा दिसणारा असा आराखडा तयार करून पुतळ्याचा सुशोभीकरण करण्यात आल्याचे धीरज देशमुख यांनी सांगितले.
देवगिरी केल्यासारखे असणार वाहतूक बेट
क्रांती चौक येते शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्वीपासूनच होते. (Chhatrapati Shivaji Maharaj In Aurangabad) मात्र, त्याची उंची वाढवण्याचे काम करण्यात आले. त्या सोबतच वाहतूक बेट आणि शिवाजी महाराजांचे स्मारक याचे सुशोभीकरण करण्यासाठी विशेष डिझाईन तयार करण्यात आले. ज्यामध्ये वाहतूक बेट ऐतिहासिक वाटणार आहे. त्यामध्ये देवगिरी किल्ल्याचा सारखा देखावा तयार करण्यात येत आहे. त्याला बाहेरून तटबंदी, त्यामागे पाणी, दगडी भिंती, महाल, तोफ, कमान यांचा वापर करण्यात आला आहे. इतकेच नाही तर कमानीमध्ये जवळपास 24 मावळे हे असणार आहेत.