औरंगाबाद - मेडिकल वेस्ट आढळल्यावर औषधाच्या दुकानदारांना दंड लावणाऱ्या महानगर पालिकेनेचे अँटीजेन टेस्टनंतर वेस्ट फेकून दिल्याचा प्रकार सातारा परिसरात समोर आला. या ठिकाणच्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये वापरलेले पीपीई किट आणि अँटीजेन टेस्ट किटसह इतर साहित्य टाकून मनपाचे पथक निघून गेले.
अँटीजेन टेस्ट शिबिरानंतर वैद्यकीय कचरा तसाच; महापालिका पथकाचा बेजबाबदारपणा उघडकीस - corona in aurangabad
मेडिकल वेस्ट आढळल्यावर औषधाच्या दुकानदारांना दंड लावणाऱ्या महानगर पालिकेनेचे अँटीजेन टेस्टनंतर वेस्ट फेकून दिल्याचा प्रकार सातारा परिसरात समोर आला. या ठिकाणच्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये वापरलेले पीपीई किट आणि अँटीजेन टेस्ट किटसह इतर साहित्य टाकून मनपाचे पथक निघून गेले.
शिबीर संपल्यानंतर वापरलेले पीपीई किट, अँटीजेन टेस्ट किट आणि इतर साहित्य सभागृहातच सोडून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. हा कचरा आरोग्यासाठी धोकादायक असल्याने त्यामार्फत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. याबाबत पालिकेला विनंती करण्यात आली. मात्र पालिकेने गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे विभाग प्रमुख रणजीत ढेपे आणि शिवसेना वैद्यकीय कक्ष सदस्य प्रदीप जाधव यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली.
त्यानंतर एक पथक आले. मात्र कोरोना तपासणी शिबिरात दहा जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच ते कचरा न उचलताच माघारी फिरले. याबाबत रात्री उशिरा मनपा आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तातडीची पावले उचलत एक पथक रवाना केले. सकाळी या पथकाने वैद्यकीय कचरा उचलला असून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई आयुक्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.