महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पती कुटुंबियांपासून वेगळे राहत नसल्याने विवाहितेची आत्महत्या - Aurangabad Latest News

मी एकत्रित कुटुंबात काम करत नाही, असे सुसाईड नोटमध्ये लिहून पती कुटुंबियांपासून वेगळे राहत नसल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद येथील वाळूज परिसरात घडली आहे.

पपिता राहुल वानखेडे
पपिता राहुल वानखेडे

By

Published : Jun 22, 2021, 9:47 AM IST

औरंगाबाद: एकत्रित कुटुंबात मी काम करत नाही. पती कुटुंबीयापासून वेगळे राहत नाही, म्हणून मी आत्महत्या करीत आहे. पतीचा काहीही संबंध नाही, अशी सुसाईड नोट लिहून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास वाळूज भागात घडली. पपिता राहुल वानखेडे (२४, रा.साई कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

बेडरुम मध्येच घेतला गळफास

पपिता हिने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सासरा, दिर व पतीला जेवणाचा डबा करून दिला. सासू आणि नणंद या दोघी दहा महिन्यांच्या मुलीला झोपी घालत होत्या. तर पपिता ही बेडरूममध्ये होती. बराच वेळ झाला तरी पपिता बाहेर आली नाही. ती आवाजाला देखील प्रतिसाद देत नसल्याने शेवटी दोघींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी पपिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला बेशुद्धावस्थेत तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गोरख चव्हाण व मनिषा केदार करत आहेत.

घातपाताचा कुटुंबियांना संशय

लग्न झाल्यापासून आमच्या मुलीला त्रास होता. तसेच तिचा पती तिच्यावर कायम संशय घेत होता. आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तसे तिच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर आणि तिचे हस्ताक्षर यात फरक असल्याचे पपिताचे नातेवाईक प्रवीण इंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा -Nagpur Murder Mystery : मेहूणी आणि जावाईच्या वादातून घडले पाच जणांचे हत्याकांड

ABOUT THE AUTHOR

...view details