महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Marathwada Muktisangram Din 2022 : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन आहे. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले.

cm eknath shinde
Etv Bharatमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Sep 17, 2022, 8:08 AM IST

औरंगाबाद -आज मराठवाडा मुक्तीसंग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले.

वीरांना केले अभिवादन - मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन. हा लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्यावतीने शिंदेंनी आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा - यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध घोषणा केल्या आहेत. औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटी निधी देण्यात येणार आहे. पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प राबवणार आहे. जालना पाणीपुरवठा नूतनीकरण सुरू करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. लातूरमध्ये कृषी महाविद्यालयासाठी तरतूद करण्यात येणार आहे. मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details