औरंगाबाद : (Aurangabad Division) मराठवाड्यात सुरू असलेल्या भीषण पावसाचा तडाखा सर्वसामान्यांना बसत आहे. मागील दहा दिवसात झालेल्या पावसामुळे ३४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर लहान मोठी अशी तब्बल ३५१ जनावर वाहत्या पाण्यात वाहून गेली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने (Marathwada District Administration) दिली आहे.
जिल्हा प्रशासनाची माहीती :जुलै महिन्यात पाऊस वाढला:मराठवाड्यात जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने यंदा शेतकऱ्यांची चिंता वाढेल अशी परिस्थिती असताना जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. औरंगाबादविभागात नांदेड, हिंगोली भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यात पावसामुळे ३४ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात वीज पडल्याने २४ जणांचा तर ९ जनांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तसेच, लहान मोठी अशी ३५१ जनावर दगावली आहेत. त्यात २५१ दुधाळ जनावरांच्या समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.