औरंगाबाद -आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून आपला रोष व्यक्त करत आहेत. मराठा आंदोलकांनी घरावर काळे झेंडे लावून आपला रोष व्यक्त केला.
माहिती देताना याचिकाकर्ते विनोद पाटील हेही वाचा -पोलीस निरिक्षक पतीचा कोरोनाने मृत्यू, तिसऱ्याच दिवशी डॉक्टर पत्नी कामावर झाली रुजू
केंद्र आणि राज्य सरकारने न्याय द्यावा -
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी काळे झेंडे लावून निषेध व्य्क्त केला आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनीही घरावर निषेधाचे काळे झेंडे लावले. तसेच काळे कपडे परिधान करत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. आरक्षणाबाबत सरकार असेल किंवा विरोधी पक्ष न्याय देईल असे वाटत असताना आमच्या अपेक्षा भंग केला आहे. त्यामुळे आता घरोघरी जाऊन निषेध व्यक्त करणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. सरकार आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप न करता आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
विनोद पाटील यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील, आप्पासाहेब कुढेकर, अभिजित देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. कोणतेही कारण पुढे न करता आम्हाला न्याय द्या, अशी मागणी रमेश केरे पाटील आणि आप्पासाहेब कुढेकर यांनी केली.
हेही वाचा -बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र