महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये हॉटेल रुममध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

आपल्याकडे अजूनही प्रेमविवाहांना समाजमान्यता मिळालेली नाही. त्यामुळे अनेकदा घरच्यांच्या विरोधात प्रेमीयुगुल पळून जाऊन लग्न करतात. किंवा मग तेही जमलं नाही तर टोकाचं पाऊलही उचलतात. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन ( Aurangabad Railway Station Area ) परिसरातील हॉटेल मध्ये ( Lover Has Suicide In Hotel Room )घडली आहे. या प्रकरणी पोलीस विभाग तपास करत आहे.

Aurangabad Crime
औरंगाबादमध्ये हॉटेल रुममध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By

Published : Aug 4, 2022, 11:46 AM IST

Updated : Aug 4, 2022, 12:27 PM IST

औरंगाबाद -रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल मध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्या ( Suicide In Hotel Room In Aurangabad ) केल्याची धक्कादायक घटना ( Lover Has Suicide In Hotel Room ) समोर आली. प्रियकराने गळफास घेतला तर प्रियासिने विषारी औषध घेतल्याचे उघड झाले. तर आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सागर राजेश बावणे (वय २१ रा. ऐन ६ सिडको) आणि सपना अंकुश खंदारे (वय १९ रा. मुकुंदवाडी) असे प्रेमी युगुलाचे नाव आहे. रेल्वेस्टेन परिसरातील हॉटेल ग्रेट पंजाब ( Hotel Great Punjab Aurangabad ) येथे खोली क्र. २०५ मधे त्यांचे मृतदेह आढळून आले आहे. सागर बीए च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता, तर सपना बारावी मध्ये शिक्षण घेत होती. दोघे आंतरजातीय असल्याचा समोर आले आहे.



अशी उघड झाली घटना -सागर याने 29 जुलै रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये आपली खोली बुक केली होती. तीस जुलैला सपना त्या खोलीत दाखल झाली. त्यावेळी हॉटेल चालकाने प्रक्रिया पार पाडत, त्यांचे आधार कार्ड देखील घेतले होते. ते दोघे रूम मध्ये गेल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडलाच नाही. दोन ऑगस्टच्या रात्री हॉटेलचा कर्मचारी साफसफाई करत असताना रूम क्रमांक 205 मधून घानवास येत होता. कर्मचाऱ्याने खोलीचा दरवाजा वाजवला असता कुठलाही प्रतिसाद मिळून आला नाही. त्यांनी तातडीने हॉटेल व्यवस्थापकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर संशय आल्याने त्यांनी तातडीने वेदांत नगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी हॉटेलचा दरवाजा उघडला असता त्यामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यांच्या मृतदेह पोलिसांनी उत्तरी तपासणीसाठी घाटी रुग्णालयात ( Government Hospital Ghati ) पाठवले.



सपना बेपत्ता असल्याची दिली होती तक्रार -सागर आणि सपना यांच्यातील प्रेम संबंधाची त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. सपना खंदारे ही दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने तिच्या कुटुंबियांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दिली होती. मात्र सागर बाबत तशी तक्रार सिडको पोलीस ठाण्यात देण्यात आली नव्हती. तो अधून मधून बाहेर जायचा त्यामुळे त्याबाबतीत कोणालाही संशय हा आला नव्हता. मात्र सपनाच्या वडिलांनी आपण लगेच तक्रार दिली असल्याचं वेदांत नगर पोलिसांना सांगितलं.

हेही वाचा :Pune Crime : धक्कादायक ! कोंढव्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून

Last Updated : Aug 4, 2022, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details