औरंगाबाद - शहरातील एकाच कॉलनीत राहणाऱ्या दोन मैत्रिणींचे प्रेम ( Love affair two girls Aurangabad ) बहरले. त्या बरेच दिवस सोबत राहिल्या. सोबत फिरल्या. मात्र, काही दिवसांनी एकीला स्वभाव जड वाटू लागला आणि तिने सोबत न राहण्याचा निर्णय सांगितला. मात्र, दुसरीला हा निर्णय मान्य नसल्याने तिने याला विरोध केला. यामुळे दोघींमध्ये वाद वाढला. एकीने आत्महत्येचा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. प्रकरण एकूण पोलीसही चक्रावले. दरम्यान दोघींची समजूत काढून प्रकरण मिटवण्यात आले.
काय होता प्रकार -सायली आणि सोनाली (काल्पनिक) या दोन मैत्रिणी. दोघी एकाच कॉलनीत सोबत राहतात. दोघींचे कॉलेजही एकच असल्याने दोघींच्या भेटी रोज होत असे. दोघी एकमेकींच्या घरी येत जात. दरम्यानच्या काळात दोघींची घट्ट मैत्री झाली. अन या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सायली आणि सोनाली अनेक दिवस सोबत राहिल्या. मात्र, काही दिवसांनी सायलीला सोनालीचा स्वभाव खटकायला लागला. सोनाली अधिकार गाजवते, असे सायलीला वाटू लागले. यामुळे सायलीने सोनालीला संबंध यापुढे ठेवण्यास नकार दिला.