महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Loudspeaker Controversy : भोंगा राजकारणात रस नाय, आम्ही भले अन् आमचा व्यवसाय भला; भोंगे व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया - भोंग्यावरून राजकारण तापले

राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापले (Loudspeakers Controversy in Maharashtra) आहे. आमचा व्यवसाय हिंदू आणि मुस्लिम यांच्यासह सर्वच धर्मियांवर चालतो. त्यामुळे आम्ही भले आणि आमचा धंदा भला, असे मत औरंगाबादच्या भोंगे व्यावसायिकांनी (Aurangabad Loudspeakers Businessman Reaction) दिले आहे.

Loudspeakers Businessman
भोंगा व्यावसायिक

By

Published : Apr 20, 2022, 4:24 PM IST

Updated : Apr 20, 2022, 4:59 PM IST

औरंगाबाद - राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापले (Loudspeakers Controversy in Maharashtra) आहे. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray on Loudspeakers Controversy) यांच्या वक्तव्यावरून आम्हाला फरक पडत नाही. आमचा व्यवसाय हिंदू आणि मुस्लिम यांच्यासह सर्वच धर्मियांवर चालतो. त्यामुळे आम्ही भले आणि आमचा धंदा भला, असे मत औरंगाबादच्या भोंगे व्यावसायिकांनी (Aurangabad Loudspeakers Businessman Reaction) दिले आहे.

भोंगा व्यावसायिक कुशल खंडेलवाल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी

भोंगे विक्री वाढली, मात्र त्याचे कारण - यंदा भोंगे विक्री वाढली आहे. मात्र, त्याला राज ठाकरे किंवा राजकीय पक्ष यांच्यामुळे नाही अशी माहिती शहागंज येथील व्यावसायिक कुशल खंडेलवाल यांनी दिली. दरवर्षी रमझान महिन्यात मशीदमधील देखभाल दुरुस्ती केली जाते. त्यावेळी खराब झालेले भोंगे दुरुस्ती केली जाते किंवा बदलले जातात. त्यात एप्रिल आणि मे महिन्यात महापुरुषांच्या जयंती, राम नवमी, हनुमान जयंती असे सण येतात, म्हणून दरवर्षी या दोन महिन्यांमध्ये भोंग्यांची विक्री वाढलेली असते. त्याला राज ठाकरे यांचे भाषणाचा परिणाम मुळीच म्हणता येणार नाही, असे व्यावसायिक कुशल खंडेलवाल यांनी सांगितले.

आम्हाला वक्तव्याशी घेणेदेणे नाही - राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर भोंगे लावण्यावरून राजकारण तापले आहे. त्यात मंदिरावर भोंगे लावा असे त्यांनी सांगितले, हे त्यांचे वैयक्तिक मत असून या मताशी व्यावसायिकांना काहीही देणेघेणे नाही, असे औरंगाबादच्या व्यावसायिकांनी सांगितले. भोंगे घेणारा व्यक्ती हा सर्व धर्मांचा असतो. त्यामुळे कोणत्याही धार्मिक गोष्टीवर आम्हाला काही विशेष रस नाही. कारण आमचा व्यवसाय हा सर्व धर्मियांच्या नागरिकांवर अवलंबून आहे. त्यामुळे या वक्तव्यांना आपल्याला महत्त्व देण्याची गरज वाटत नाही, आपण भले आणि आपले काम भले, असे मत औरंगाबादच्या व्यावसायिकांनी व्यक्त केले.

भोंग्यांच्या किंमतीत वाढ - मागील काही दिवसात भोंग्यांमुळे काही राजकीय पक्ष चर्चेत आले आहेत. या मुद्द्याला हात घातल्यावर त्याची राजकीय किंमत वाढेल का नाही माहीत नाही. मात्र, महागाईच्या गर्दीत भोंग्यांच्या किंमतीत जवळपास 25 टक्के वाढ झाली आहे. अल्युमिनियमच्या किमती आणि इंधनाचे वाढत्या दरांमुळे 700 रुपयांना मिळणारा भोंगा आता 900 ते 950 रुपयांवर आले आहेत, अशी माहिती व्यापारी कुशल खंडेलवाल यांनी दिली.

हेही वाचा -पुण्यात विद्यार्थी काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात भोंगा आंदोलन

Last Updated : Apr 20, 2022, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details