महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, विद्यापीठाने घेतला शुल्कमाफीचा निर्णय

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केला आहे. तर, शुल्कवाढीवर फेरविचार करून निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

By

Published : Oct 10, 2021, 7:39 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

औरंगाबाद - मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केला आहे. तर, शुल्कवाढीवर फेरविचार करून निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फेरविचार करून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेऊ

विद्यापीठात झालेल्या अधिसभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सदस्य अॅ. संजय काळबांडे यांनी अतिवृष्टीने झालेल्या पिकांची तीव्रता सभागृहात मांडून शुल्कमाफी देणे गरजेचे असल्याची मागणी करत ठरावाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शेतकरी, कष्टकऱ्यांचे मुलं शिक्षण घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कासह परीक्षा शुल्कात यावर्षी माफी देण्यात येईल. यावेळी परकीय भाषा विषयाची शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी सुनील मगरे यांनी केली. त्यावर फेरविचार करून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेऊ, असेही डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अंदाजे 4 हजार कोटींचे नुकसान- अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details