औरंगाबाद - राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात ईदची नमाज पठन करून देण्याची मागणी करण्यात आली ( Namaz Pathan At Shivaji Park ) आहे. ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठन करण्यावरुन राजकारण केले जाते. त्यामुळे शिवाजी पार्कवर नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी औरंगाबादमधील अॅड. नईम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राव्दारे केली आहे.
अनेक उत्सव शिवाजी पार्कवर - शिवाजी पार्कवर अनेक उत्सव देखील साजरे केले जातात. त्यात आंबेडकर जयंती, दसरा मेळावा, पाडवा, गणेश उत्सव असे सण देखील उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे दरवर्षी ईदची नमाज पठन करू देण्याची मागणी शेख यांनी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, महापालिकेला त्याबाबत पत्र दिले आहे.