महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

"औरंगाबाद नामांतरा बाबत तिन्ही पक्षांचे नेते बसून मार्ग काढतील"

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबतची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहित आहे. यावरून महाविकास आघाडीत कोणतीही फूट पडणार नाही. तिन्ही पक्षांचे नेते बसून यावर मार्ग काढतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी म्हटले आहे.

uday samant latest news
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर

By

Published : Jan 5, 2021, 7:27 AM IST

Updated : Jan 5, 2021, 12:00 PM IST

रत्नागिरी - औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबतची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहित आहे. यावरून महाविकास आघाडीत कोणतीही फूट पडणार नाही. तिन्ही पक्षांचे नेते बसून यावर मार्ग काढतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी म्हटले आहे. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर


काही गोष्टी पसरवल्या जाताहेत - उदय सामंत
सामंत म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतरणाची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहिती आहे, पण काही लोकांना असे वाटते की, हा विषय मोठा वाढवल्याने महाविकास आघाडीत फूट पडेल, सरकारवर त्याचा परिणाम होईल, यासाठी काही गोष्टी पसरवल्या जाताहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने चालले आहे. या विषयावर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे सामंत यांनी म्हटले आहे.


चिपी विमानतळ होण्यासाठी खा. विनायक राऊत यांचा पाठपुरावा
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ होण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा केला. केंद्र सरकारमध्ये त्यांनी बैठका लावल्या. त्यामुळे यामध्ये राजकारण कोण करतंय? याच्यामध्ये न पडता, श्रेय कुणाला मिळतंय याचा विचार न करता चिपी विमानतळावरील विमानातून सिंधुदुर्गातील शेतकरी मुंबईला जाईल यातून मला समाधान मिळेल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -धक्कादायक! मालाडमध्ये मैत्रिणीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

Last Updated : Jan 5, 2021, 12:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details