औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असल्याने अनेक उमेदवारांना कार्यकर्त्यांची गरज भासत आहे. यासाठी भाड्याने कार्यकर्ते आणण्यात येत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना प्रचाराच्या कामासाठी आणले जात आहे. दिवसभर मोलमजुरी करून जेवढे पैसे मिळत नाहीत, तेवढे दोन तासांच्या सभा किंवा रॅली मध्ये उपस्थित राहण्यासाठी मिळतात. त्यामुळे शेकडो कमगारांनी भरलेला शहरातील शाहगंज येथील कामगार नाका आता ओस पडला आहे.
निवडणुकीत कामगारांना 'अच्छे दिन'; मजूर झाले पगारी कार्यकर्ते - औरंगाबाद मजूर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असल्याने अनेक उमेदवारांना कार्यकर्त्यांची गरज भासत आहे. यासाठी भाड्याने कार्यकर्ते आणण्यात येत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना प्रचाराच्या कामासाठी आणले जात आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात सभा, रॅलींचे सत्र सुरू असल्याने अंगावर नेत्यांनी दिलेली शाल आणि हातात पक्षाचा झेंडा घेऊन येणारे बहुतांश कार्यकर्ते मजूर अड्ड्यावरून रोजंदारीवर घेतलेले आहेत. महिला असल्यास 250 ते 400 रुपये आणि पुरुष असल्यास 300 ते 500 रुपये प्रत्येक सभेमागे मिळत असल्याने मजूरांचा तात्पुरता पोटाचा प्रश्न सुटला आहे.
शहरातील कामगार साठी प्रसिद्ध असलेला शाहगंज येथील कामगार नाक्यावर रोज 500 ते 600 कामगार सकाळपासूनच कामाच्या शोधात येत असतात. गेल्या पाच वर्षांत देशात बेरोजगारी वाढली असली तरीही सध्या निवडणुकीच्या काळात मजुरांना 'अच्छे दिन' आले आहेत.