औरंगाबाद: खुलताबाद गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. Khuldabad Urus famous त्याच बरोबर तेथील खाद्य संस्कृती देखील वेगळी आणि विशेष अशी आहे. Urus famous Khaja food खाजा खावा तर फक्त खुलताबादचाच अस म्हणलं जात. उरुस साजरा केला जात असताना जवळपास खाजा विक्रीच्या दीडशे दुकान थाटण्यात आली असून यंदा विक्रमी विक्री होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे.
Khaja Food : खुलताबादच्या उरुसात खाजाची भुरळ, या ठिकाणी मिळतो सर्वात चविष्ट - खाद्य संस्कृती देखील वेगळी आणि विशेष
Khaja: खुलताबाद गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. Khuldabad Urus famous त्याच बरोबर तेथील खाद्य संस्कृती देखील वेगळी आणि विशेष अशी आहे. Urus famous Khaja food खाजा खावा तर फक्त खुलताबादचाच अस म्हणलं जात. उरुस साजरा केला जात असताना जवळपास खाजा विक्रीच्या दीडशे दुकान थाटण्यात आली असून यंदा विक्रमी विक्री होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे.
![Khaja Food : खुलताबादच्या उरुसात खाजाची भुरळ, या ठिकाणी मिळतो सर्वात चविष्ट Khaja](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16579519-850-16579519-1665144652535.jpg)
असा असतो खाजाखाजा म्हणजे मोठी गोडपुरी. मैदा, साखर, खवा, तूप यांच्यापासून हा तयार केला जातो. गोडपुरी जरी असली तरी ती, नेहमी सारखी मुळीच नसते. एकाच पुरीमध्ये एकमेकांवर आवरण असतात. ती तयार करण्याची विशेष पद्धत आहे. आधीपुरी तयार करून त्यामध्ये असलेलं तूप काढलं जात. त्यानंतर साखरेच्या पाकात फुजवल जात. त्यानंतर तयार होतो खाजा. हा पदार्थ लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडता ठरतो. काही ठिकाणी खाजा मिळतो. मात्र खुलताबाद येथे तयार होणारा चविष्ट असतो. गोड आणि कुरकुरीत अशा दोन प्रकारात तो तयार होतो. वर्षभर खाजा विक्री सुरू असते, अशी माहिती व्यावसायिक समीर खान यांनी दिली.
होते मोठी रोजगार निर्मितीखुलताबाद येथे हजरत ख्वाजा मुंतजीबोद्दिन जर जरी बक्ष यांच्या 836 व्या उरसाला उत्साहात सुरुवात झाली. या उत्सवात वैशिष्ट्य असतं ते जगप्रसिद्ध खाजा या खाद्यपदार्थाचे. यावर्षी सुरू झालेल्या जत्रेत दीडशेहून अधिक दुकान खाद्याची थाटण्यात आली आहेत. साधारणतः 200 ते 250 रुपये किलो दराने, हा खाजा विक्री केला जातो. स्थानिक व्यावसायिकांसह उत्तर प्रदेश, कानपूर येथील खाजाविक्रेते खुलताबाद येथे दाखल झाले आहेत. त्या व्यतिरिक्त वर्षभर काही कुटुंब खाजा तयार करण्याचे काम करत असतात. त्यानिमित्ताने मोठी उलाढाल होत असून त्यातून मोठी रोजगार निर्मिती देखील होते, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.