महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे खेळ गुढी, राजकीय महिलांचा रंगला क्रिकेट सामना

गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने राज्यातील कोरोना नियम शिथिल करण्यात आले आहेत. मैदान पूर्ण क्षमतेने खुली झाली आहेत. त्याचे औचित्य साधून कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे खेळ गुढीचे ( Kulswamini Pratishthan Khel Gudi ) आयोजन करण्यात आले.

Kulswamini Pratishthan Khel Gudi
कुलस्वामिनी प्रतिष्ठान गुढीपाडवा

By

Published : Apr 3, 2022, 10:21 AM IST

औरंगाबाद - गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने राज्यातील कोरोना नियम शिथिल करण्यात आले आहेत. मैदान पूर्ण क्षमतेने खुली झाली आहेत. त्याचे औचित्य साधून कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे खेळ गुढीचे ( Kulswamini Pratishthan Khel Gudi ) आयोजन करण्यात आले. खेळाला प्राधान्य देण्यासाठी ही गुढी उभारण्यात आली. यावेळी महिलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. विशेषतः भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा सामना चांगलाच रंगला.

माहिती देताना भाजपच्या महिला पदाधिकारी

हेही वाचा -Chandrakant Khaire Statement : गृहमंत्री पद मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे हवे - चंद्रकांत खैरे

खेळाला प्राधान्य देण्यासाठी 'खेळ गुढी' :खेळ खेळल्याने आरोग्य चांगले राहते, असे नेहमीच सांगितले जाते. त्यात कोरोनामुळे आरोग्य चांगले ठेवण्याचे महत्व सर्वांना पटले आहे. त्यामुळे, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणतातरी खेळ नियमित खेळा, असा संदेश देण्यासाठी कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे खेळ गुढी उभारण्यात आली. एकवीस फुटी गुढीसह क्रिकेट बॅट, स्टंप, बॅटमिंटन रॅकेट यांच्यासह इतर खेळ साधनांच्या गुढी उभारण्यात आल्या. खेळ महत्वाचे असून, खेळाला चालना मिळावी यासाठी गुढी उभारल्याची माहिती कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे आणि अलका कोरडे यांनी दिली.

महिलांनी खेळला क्रिकेट सामना:सिडको येथील कुलस्वामीन प्रतिष्ठान तर्फे खेळ गुडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. महिलांनी पारंपारिक खेळ देखील खेळले. त्यानंतर महिलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यामध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी खेळलेला सामना चांगलाच रंगला होता. यावर्षी कोरोनाचे निर्बंध उठले असून, सर्व सुरळीतपणे चालेल, असा विश्वास महिलांनी व्यक्त केला. तर, आगामी दोन-तीन महिन्यानंतर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी आमची तयारी सुरू आहे आणि भाजप सक्षम पक्ष होईल, असा विश्‍वास भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -Congress Dung Throwing Agitation : बबनराव लोणीकर यांच्या बंगल्यावर काँग्रेसचे शेणफेक आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details