औरंगाबाद - टाळेबंदीमुळे कौटुंबिक तणाव वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. टाळेबंदीमुळे घरी असलेल्या नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा, अशी मागणी पत्नी पीडित संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. टाळेबंदीमुळे महिनाभर जवळपास सर्वच पुरुष मंडळी घरी असताना पुरुषांच्या छळाचे प्रकार वाढल्याचे संघटनेने म्हटले आहे.
टाळेबंदीत अनेक ठिकाणी महिलांकडून पुरुषांचा छळ केला जात आहे. त्यामुळे वैतागलेला पुरुष घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब त्या व्यक्तीसाठी आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने समाजालादेखील घातक आहे. त्यामुळे अशा महिलांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पत्नी पीडित संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारी यांनी केली आहे.
हेही वाचा-'केशरी रेशन कार्डधारकांना राज्य सरकारकडून तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ'
महिलांचा छळ केल्यास कारवाईचा पोलीस प्रशासनाने दिला आहे इशारा-
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात टाळेबंदी करण्यात आळी आहे. कोणीही घराबाहेर पडू नये असे, सरकारने निर्देश दिले आहेत. मात्र, सर्वच लोक घरात असल्याने कौटुंबिक हिंसाचार वाढत असल्याचे काही प्रमाणात समोर आले आहे. महिलांचा छळ केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. मात्र पुरुषांचादेखील छळ होत असल्याचा आरोप पत्नी पीडित पुरुष संघटनेने केला आहे. ही राज्यातील एकमेव संघटना पुरुषांच्या हक्कासाठी लढते आहे.
हेही वाचा-सुंदर पिचाई यांना वेतनांसह मिळणारे भत्ते जगात सर्वाधिक; आकडा ऐकून व्हाल थक्क